अपेक्षा सकपाळ
खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा वारंवार एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. दरम्यान शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून तर दिपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. यानिर्णयानंतर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. सध्या लोकशाहीची थट्टा सुरु आहे. आमच्याकडून राजकारण कमी झालं. सर्कसमध्ये काहीही होऊ शकतं, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहे. एकीकडे दोन गटातील दावे-प्रतिदावे सुरु असतानाच शिवसेनेची घटना काय सांगते, ते तपासण्याची किंवा तिचे दाखले देण्याचे काम कोणतेही माध्यम करताना दिसत नाही. त्यामुळे कायदे अभ्यासक प्रवीण बिरादार यांच्याशी संवाद साधून मुक्तपीठने महत्वाची माहिती मिळवली आहे.
चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसते, आदित्य ठाकरे
- सर्कसमध्ये काहीही होऊ शकते.
- राज्यात जे सुरु आहे ते घटनाबाह्य आहे.
- ही लोकशाहीची थट्टा सुरु आहे.
- मी याकडे जास्त लक्ष देत नाहीये.
- आमच्याकडून राजकारण कमी झालं, हा आमचा दोष असू शकतो.
- चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसते.
- त्यामुळे हादेखील आमचा दोष असू शकतो.
- आम्ही लोकांची २४ तास सेवा करत आहोत.
- आमचं हे काम अजूही सुरु आहे.
शिंदे गटानं राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली!
- शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के दिले जात आहेत.
- एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नवी कार्यकारिणी स्थापन केली आहे.
- या कार्यकारिणीमध्ये शिवेसेनेतील बंडखोर आमदार आणि नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.
- या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्यनेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- तर दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
- तानाजी सावंत, विजय नहाटा, यशवंद जाधव, गुलाबराव पाटील यांची शिवसेना उपनेते म्हणून तर आज शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
- पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांचे नाव कायम ठेवण्यात आले आहे.
शिवसेनेची घटना काय सांगते?
- शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख पद हे सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली आहे.
- त्या पदावर २०१७च्या निवडणूक आयोगाकडे सादर निवडणूक ठरावानुसार उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख हे राष्ट्रीय कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा यांच्यासह कामकाज करतात.
- शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसेना नेते, पदाधिकारी नेमू शकतात तसेच काढूही शकतात.
- शिवसेना पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदे, आनंदराव अडसुळ आणि रामदास कदम यांची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी केलेली आहे.
- तसेत घटनेप्रमाणे पक्षनेत्यांना शिवसेनेसंदर्भात कोणतेही संघटनात्मक नियुक्ती करण्याचे, हकालपट्टीचे अधिकार नाहीत.
- त्यामुळे शिवसेना कार्यकारिणी बरखास्त किंवा नवी नेमणे हे एकनाथ शिंदेंना करण्याचा अधिकारच नाही.
- त्यांनी शिवसेनेच्या पदांवर कोणालाही नेमले तरी ते शिवसेनेच्या घटनेनुसार नाही.