मुक्तपीठ टीम
कर्करोगाच्या रूग्णांमध्ये महिलांमध्ये कर्करोग जास्त आढळून येतो. कर्करोगाचा सामना करण्यासाठी जीवन-मरणांचा खडतर प्रवास करावा लागतो. महिलांना होणारा कर्करोग हा गर्भाशयाचा आणि ब्रीस्ट कॅन्सर जास्त असतो. आता भारताने गर्भाशयाच्या कर्करोगावर स्वदेशी उपचार आणला आहे. स्वदेशी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस आता महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून वाचवण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे विकसित केलेल्या गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार करणाऱ्या लसीला मान्यता दिली आहे. लवकरच ते देशाच्या राष्ट्रीय लसीकरण अभियानाचा भाग बनू शकते.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे काय?
- गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढल्यास मृत्यूचाही धोका असतो.
- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात, गर्भाशयाच्या तोंडावर एक गाठ तयार होते, ज्यामुळे आसपासच्या ऊतींचा नाश होतो.
- हा कर्करोग विषाणूमुळे होतो.
- ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असे या विषाणूचे नाव आहे. एचपीव्ही शरीरात गेल्यानंतर कर्करोग होण्यासाठी १०-१५ वर्षे लागतात.
लसीविषयी सविस्तर माहिती
- ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस दिली जाऊ शकते.
- मिळालेल्या माहितीनुसार, “सुरुवातीला ही लस फक्त मुलींना दिली जाईल, पण नंतर ती मुलांनाही दिली जाईल.”
- देशात ही लस तयार होत असल्याने किंमतीत मोठी अडचण येणार नाही.
- सध्या सिरम इन्स्टिट्यूटने या लसीच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण कंपनीचे म्हणणे आहे की, या वर्षाच्या अखेरीस ते बाजारात येऊ शकते.
- ही लस २६ वर्षांपर्यंतच्या मुलींना सेक्स करण्यापूर्वी दिल्या जाऊ शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- एचपीव्ही लसीची किंमत प्रति डोस २ हजार ते ३ हजार रुपये आहे.
- देशात सध्या दोन एचपीव्ही लसी आहेत, ज्या परदेशी कंपन्यांनी तयार केल्या आहेत. यापैकी एक लस गार्डासिल आहे, जी मर्कने उत्पादित केली आहे, तर दुसरी सर्व्हरिक्स आहे, जी ग्लॅक्सोस्मिथक्लाइनद्वारे निर्मित आहे.
- सीरम या सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यामुळे किंमती कमी होतील अशी आशा आहे.
- सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेमध्ये या लसीचा समावेश करणे हे महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची समस्या कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
- देशातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतात ४८.३५ कोटींहून अधिक महिलांची लोकसंख्या आहे. यापैकी १५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुली आणि महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका असतो. सध्याची आकडेवारी दर्शवते की, दरवर्षी सुमारे १ लाख २३ हजार ९०७ महिलांना गर्भाशय ग्रीवाच्या समस्यांचे निदान होते. या आजारामुळे ७७ हजार ४३८ महिलांचा मृत्यू झाला.