Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा उपचार सोपा होणार, स्वदेशी इंजेक्शन उपयोगी ठरणार!

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
cervical cancer

मुक्तपीठ टीम

कर्करोगाच्या रूग्णांमध्ये महिलांमध्ये कर्करोग जास्त आढळून येतो. कर्करोगाचा सामना करण्यासाठी जीवन-मरणांचा खडतर प्रवास करावा लागतो. महिलांना होणारा कर्करोग हा गर्भाशयाचा आणि ब्रीस्ट कॅन्सर जास्त असतो. आता भारताने गर्भाशयाच्या कर्करोगावर स्वदेशी उपचार आणला आहे. स्वदेशी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस आता महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून वाचवण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे विकसित केलेल्या गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार करणाऱ्या लसीला मान्यता दिली आहे. लवकरच ते देशाच्या राष्ट्रीय लसीकरण अभियानाचा भाग बनू शकते.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे काय?

  • गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढल्यास मृत्यूचाही धोका असतो.
  • गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात, गर्भाशयाच्या तोंडावर एक गाठ तयार होते, ज्यामुळे आसपासच्या ऊतींचा नाश होतो.
  • हा कर्करोग विषाणूमुळे होतो.
  • ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असे या विषाणूचे नाव आहे. एचपीव्ही शरीरात गेल्यानंतर कर्करोग होण्यासाठी १०-१५ वर्षे लागतात.

लसीविषयी सविस्तर माहिती

  • ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस दिली जाऊ शकते.
  • मिळालेल्या माहितीनुसार, “सुरुवातीला ही लस फक्त मुलींना दिली जाईल, पण नंतर ती मुलांनाही दिली जाईल.”
  • देशात ही लस तयार होत असल्याने किंमतीत मोठी अडचण येणार नाही.
  • सध्या सिरम इन्स्टिट्यूटने या लसीच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण कंपनीचे म्हणणे आहे की, या वर्षाच्या अखेरीस ते बाजारात येऊ शकते.
  • ही लस २६ वर्षांपर्यंतच्या मुलींना सेक्स करण्यापूर्वी दिल्या जाऊ शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
  • एचपीव्ही लसीची किंमत प्रति डोस २ हजार ते ३ हजार रुपये आहे.
  • देशात सध्या दोन एचपीव्ही लसी आहेत, ज्या परदेशी कंपन्यांनी तयार केल्या आहेत. यापैकी एक लस गार्डासिल आहे, जी मर्कने उत्पादित केली आहे, तर दुसरी सर्व्हरिक्स आहे, जी ग्लॅक्सोस्मिथक्लाइनद्वारे निर्मित आहे.
  • सीरम या सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यामुळे किंमती कमी होतील अशी आशा आहे.
  • सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेमध्ये या लसीचा समावेश करणे हे महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची समस्या कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
  • देशातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग पहिल्या क्रमांकावर आहे.

भारतात ४८.३५ कोटींहून अधिक महिलांची लोकसंख्या आहे. यापैकी १५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुली आणि महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका असतो. सध्याची आकडेवारी दर्शवते की, दरवर्षी सुमारे १ लाख २३ हजार ९०७ महिलांना गर्भाशय ग्रीवाच्या समस्यांचे निदान होते. या आजारामुळे ७७ हजार ४३८ महिलांचा मृत्यू झाला.


Tags: cancer treatmentCervical Cancergood newshealthmuktpeethSwadeshi Injectionआरोग्यकर्करोग उपचारगर्भाशय मुख कर्करोगचांगली बातमीमुक्तपीठस्वदेशी इंजेक्शन
Previous Post

राज्यात २३८२ नवे रुग्ण, २८५३ रुग्ण बरे! मुंबई २८२, नाशिक ५७, नागपूर ५६ नवे रुग्ण !!

Next Post

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट आणि इंडिया हेल्थ फंडशी सामंजस्य करार!

Next Post
MoU with India Health Fund in presence of Deputy Chief Minister Devendra Fadnavis

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट आणि इंडिया हेल्थ फंडशी सामंजस्य करार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!