मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले आहेत. आम्हचीच खरी शिवसेना असा दावा वारंवार एकनाथ शिंदे गटाकडून सुरु आहे. तसेच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’वर बंडखोर गटाकडून दावा करण्याची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज निवडणूक चिन्हाबाबत स्पष्टच बोलले आहे. ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून तुम्हाला हे सांगत आहे, “धनुष्यबाण हा शिवसेनाच राहणार!”
धनुष्यबाण हा शिवसेनाच राहील!!
- कायद्याच्यादृष्टीने बघायला गेल्यास शिवसेनेपासून धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
- ती चिंता सोडा.
- मतदानपत्रिकेवरील चिन्हाप्रमाणे लोक माणसाची चिन्हंही बघतात.
- लोक इतका विचार करुन मतदान करतात. मी शिवसैनिकांशी बोलताना पक्षाच्या चिन्हाबाबत मागच्या काळात काय झालं होतं, हे सांगितलं.
- पण त्याचा अर्थ आपण धनुष्यबाण हे चिन्ह सोडायचे, असा होत नाही.
- मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून तुम्हाला हे सांगत आहे.
- धनुष्यबाण हा शिवसेनाच राहणार.
शिवसेना ही काही वस्तू नव्हे…
- तसेच शिवसेनेच्या भवितव्याला कोणताही धोका नाही.
- शिवसेनेने मोठी केलेली लोकं गेली, पण ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं होतं तो सामान्य मतदार शिवसेनेसोबतच आहे.
- शिवसेना ही काही वस्तू नव्हे, कोणी घेतला आणि पळत सुटला.
- रस्त्यावरील शिवसेना पक्ष हा अद्याप आपल्यासोबतच आहे.
- ५० किंवा १०० आमदार गेले तरी पक्ष संपू शकत नाही.
- पक्ष हा कायम राहतो.
- त्यामुळे सध्या या सगळ्यावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.
- विधिमंडळ आणि नोंदणीकृत पक्ष हे दोन्ही वेगवेगळे असतात.
शिवसेना लढाई करण्यास तयार!!
- परवा शिवसेना भवनात राज्यातील सर्व महिला जिल्हाप्रमुख आल्या होत्या.
- त्या वाघिणीसारख्या बोलत होत्या.
- ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाहीये, तेही लोक येत आहेत. शिवसेनेने साध्या लोकांना मोठं केलं.
- तोच आमच्या अभिमानाचा विषय आहे.
- जे लोक मोठे झाले ते गेले. पण मोठ्या मानाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं अजूनही शिवसेनेत आहेत.
- त्यामुळे शिवसेनेला कोणी धोका पोहोचवू शकत नाही.
- शिवसेना लढाई करण्यास तयार आहे.