मुक्तपीठ टीम
पुणे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात असिस्टंट इंजिनीअर या पदासाठी ०२ जागा, जुनिअर इंजिनीअर या पदासाठी ०३ जागा, ड्राफ्ट्समन या पदासाठी ०१ जागा, इलेक्ट्रिशियन या पदासाठी ०२ जागा, स्टाफ नर्स या पदासठी ०८ जागा अशा एकूण १६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे शहर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- आर्किटेक्चरल इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चरल अॅंड रूरल इंजिनीअरिंग/अर्बन अॅंड रूरल इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चर/ डिप्लोमा इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी/ अर्बन प्लॅनिंगमधील पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता
- पद क्र.२- आर्किटेक्चरल इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चरल अॅंड रूरल इंजिनीअरिंग/ अर्बन अॅंड रूरल इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चर/ डिप्लोमा इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी
- पद क्र.३- आयटीआय सिव्हिल ड्राफ्ट्समन
- पद क्र.४- आयटीआय इलेक्ट्रिशियन
- पद क्र.५- बी.एससी नर्सिंग केलेलं असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय खडकी १७ फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, खडकी पुणे – ४११ ००३
अधिक माहितीसाठी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://kirkee.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.