Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाने का केला राहुल नार्वेकरांचा विचार? घ्या जाणून हे मुद्दे…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rahul narvekar BJP

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारपुढे आव्हानं मात्र कायम असणार. शिवसेनेतील बंडखोरांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईपासून अनेक मुद्द्यांचा सामना करावा लागणार. तशा प्रसंगी विधानसभा अध्यक्षपदावरील व्यक्ती महत्वाची भूमिका बजावणारी ठरणार आहे. त्यामुळेच बहुधा भाजपाने विधानसभा अध्यक्षपदासाठी मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील भाजपा आमदार राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे.

गुरुवारी शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर आता नवीन मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून आमदार राहुल नार्वेकर यांच्या नावावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले आहे. रविवारी सभापतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यांची या पदासाठी भाजपाने निवड करायचे कारण केवळ कायदेशीर ज्ञान नसून त्यांचं भूतकाळात शिवसेनेशी आणि राष्ट्रवादीशी असलेलं राजकीय नातं हेही असल्याची चर्चा आहे. नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराज नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत, जे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सभापती आहेत.

कोण आहेत राहुल नार्वेकर?

  • राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान आमदार आहेत.
  • राहुल नार्वेकर यांचा जन्म दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात झाला.
  • त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
  • त्यांचा भाऊ मकरंद कुलाब्यातून नगरसेवक आहे.

नार्वेकर हे रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई!

  • महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांचे जावई आहेत.
  • रामराजे नाईक-निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आहेत.

शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रवक्ते!

  • राहुल नार्वेकर हे सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रवक्ते होते.
  • २०१४ मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढले!

  • राहुल नार्वेकर यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक मावळमधून लढवली होती.
  • त्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडून पराभव झाला होता.

२०१९ मध्ये भाजपात प्रवेश

  • २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी नार्वेकर यांनी कुलाबा येथून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
  • कुलाब्यातून त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव करून विधानसभा निवडणूक जिंकली.

Tags: BJPMaharashtraNCPRahul NarvekarShivsenaभाजपामहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसराहुल नार्वेकरविधानसभा अध्यक्षपदशिवसेना
Previous Post

पुणे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध क्षेत्रात करिअर संधी

Next Post

शिंदे-फडणवीस यांचे दोन चाकी स्कूटर सरकार! हँडल मात्र मागे बसलेल्याकडे! – महेश तपासे

Next Post
Cm Eknath Shinde- Mahesh Tapase- devendra fadanvis

शिंदे-फडणवीस यांचे दोन चाकी स्कूटर सरकार! हँडल मात्र मागे बसलेल्याकडे! - महेश तपासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!