मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाही आता आक्रमक झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पाहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? असा प्रश्न विचारला आहे.
व्हिडीओत काय दिसतंय?
- गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका भाषणाचा हा व्हिडीओ संजय राऊतांनी ट्वीट केला आहे.
- या व्हिडीओत गुलाबराव पाटील म्हणत आहेत की, शिवसेनेत पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले.
- शिवसेनेत रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले.
- पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय.
- हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले.
- ‘कतलिया कही साप बदल लेते है, पुण्य की आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है’, असं गुलाबराव पाटील या व्हिडीओत म्हणत आहेत.
गुलाबराव पाटलांना पुन्हा पानटपरीवर बसाव लागेल!!
- दरम्यान रविवारी दहिसर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर जळजळीत टीका केली.
- गुलाब पाटील हे असे भाषण करायचे की, शिवसेनेमध्ये कोणी वाघच नाही जणू हे एकटेच वाघ असल्यासारखे ते वागायचे मात्र, ते पळून गेले.
- ते म्हणायचे की, मी पानटपरीवाला मला कॅबिनेट मंत्री केलं आता तुम्हाला पुन्हा पानटपरीवर बसाव लागेल.
- हे महाभारतातल्या संजयचे वक्तव्य आहे. हे लक्षात ठेवा.
- मी बाळासाहेबांच्या पायाशी बसून सुमारे ३० वर्ष काम केलं आहे.
- माझा शब्द कधी खोटा होत नाही.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये बंडखोरांच्या बदलत्या भूमिकांवर कडवट टीका केली आहे. आमदार दिलीप लांडे आदित्य ठाकरेंना भेटले. बंडखोरीमुळे व्यथित होत रडले. मिठी मारत रडले. तेच नंतर तिथं गेले. संदिपान भुमरेंच्या प्रचारसभेत स्थानिकांनी मागणी केली. आदित्य ठाकरेंनी आश्वासन दिले. उद्धव ठाकरेंनी कॅबिनेट मंत्री बनवले.