मुक्तपीठ टीम
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीने आरोपपत्र दाखल केले आहे. पण त्यात आर्यन खानचे नाव नाही. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह २० जणांना आरोपी बनवले होते. पुराव्याअभावी आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एखाद्या हिरोसारखे नेहमी प्रकाशझोतात राहणाऱ्या समीर वानखेडेंना मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या तपासकौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नाव नाही!
ड्रग कनेक्शन प्रकरणात एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव नाही. एनसीबीचे डीडीजी (ऑपरेशन्स) संजय कुमार सिंह यांनी सांगितले की, चौदा आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. पुराव्याअभावी उर्वरित सहा जणांविरुद्ध तक्रार नोंदवली जात नाही.
ड्रग्ज प्रकरणात एकूण २० जण आरोपी
- मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी एनसीबीने एकूण २० जणांना आरोपी केले आहे.
- आतापर्यंत २० पैकी १८ आरोपींना जामीन मिळाला आहे.
- ते आता तुरुंगाबाहेर आहेत, तर २ आरोपी अजूनही कारागृहात आहेत.
- आतापर्यंत जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची नावे आहेत.
वानखेडेंवर आरोप करणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू
- आर्यन खान ड्रग प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा एप्रिल महिन्यात मृत्यू झाला.
- एनसीबीचे प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल यांचे निधन झाले. प्रभाकर सेलचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
- आर्यन खान ड्रग केसमध्ये तो महत्त्वाचा साक्षीदार होता.
- मात्र, पुढे त्याने समीर वानखेडे आणि इतरांची नावे घेते ते या प्रकरणात पैसे वसूल करू पाहत होते, असा आरोप केला.
ग्लॅमर, ड्रग आणि धोका!
- आर्यन खानला गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका क्रूझ जहाजावर छापा टाकताना एनसीबीने अटक केली होती.
- जहाजात असलेल्या आरोपींवर प्रतिबंधित औषधे बाळगणे, सेवन करणे आणि विक्री करणे या आरोपाखाली विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
- त्यानंतर अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खानला जामीन मिळाला.
- या प्रकरणातील साक्षीदाराने तपास अधिकारी संचालक समीर वानखेडेंवरच आरोप केले.
- काही दिवसांनी प्रभाकर साईलचा ह्रदयविकाराने मृत्यू ओढवला.
- पण आश्चर्यकारकरीत्या एका मर्यादेपलीकडे त्यावर काहीही चर्चा झाली नाही.
- समीर वानखेडेंची काही महिन्यांपूर्वी एनसीबीतून दुसऱ्या विभागात बदली झाली.