मुक्तपीठ टीम
जर्मनची लक्झरी कार कंपनी BMWने X4 ‘सिल्व्हर शॅडो’ मॉडेल बाजारात आणलं आहे. त्याची शोरूम किंमत ७१ लाख ९० हजार रुपये आहे. चेन्नईतील बीएमडब्ल्यूच्या प्लांटमध्ये या मॉडेलचे उत्पादन करण्यात आले आहे. ही नवीन स्पेशल एडिशन पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
दिमाखदार इंटरियर!
- X4 सिल्व्हर शॅडोच्या इंटीरियर टोनमध्ये लेदर वर्नास्का अपहोल्स्ट्रीसह आहे.
- यात पर्ल क्रोम ट्रिम फिनिशरसह अॅल्युमिनियम रॉम्बिकल एम इंटीरियर ट्रिम देखील आहे.
- BMW X4 हे ब्रुकलिन ग्रे आणि ब्लॅक सॅफायर या रंगामध्ये उपलब्ध आहे.
- X4 xDrive30i M Sport आणि X4 xDrive30d M स्पोर्ट ट्रिम पर्यायांसह भारतीय बाजारात आणली आहे.
फूल टू इन्फोटेनमेंट!
- X4 मध्ये १६-स्पीकर, ४६४-वॅट, हरमन कार्डन सराउंड साऊंड सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, सहा रंगांची सभोवतालची प्रकाश व्यवस्था, एक वायरलेस चार्जर, फुल-एलईडी अॅडॉप्टिव्ह यासारखे फिचर्स आहेत.
- १२.३ इंचाचा पूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि १२.३ इंचाची हाय-डेफिनिशन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
- हेडलाइट्स, थ्री-झोन टेंपरेचर कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ऍडजस्टमेंटसह एम फ्रंट स्पोर्ट सीट्स आणि ड्रायव्हर सीटसाठी मेमरी फंक्शन, अडॅप्टिव्ह सस्पेंशन, ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आणि परफॉर्मन्स कंट्रोल देखील आहे.
दमदार इंजिन, भन्नाट वेगवान!
- पेट्रोल इंजिन मॉडेलमध्ये २५२ हॉर्सपावरच्या क्षमतेचे दोन लिटरचे इंजिन आहे.
- हे मॉडेल केवळ ६.६ सेकंदात शून्य ते १०० किमीचा वेग पकडू शकतो.
- त्याची किंमत ७१.९ लाख रुपयांपासून सुरू होते.
- त्याच वेळी, डिझेल इंजिनमध्ये तीन-लिटर इंजिन आणि २६५ हॉर्सपावरची क्षमता आहे.
- ही वाहन ५.८ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग गाठू शकते.
- त्याची किंमत ७३.९ लाख रुपयांपासून सुरू होते.
- सोमवारपासून गाडीचे ऑनलाइन बुकिंग सुरु होईल.
पाहा व्हिडीओ: