मुक्तपीठ टीम
भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला साथ दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोलेंचं ते वक्तव्य हे हास्यास्पद आहे असे म्हणत नाना पटोले काँग्रेसमध्ये भाजपामधून आले, मग भाजपाने म्हणायचं का की त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं, अशी टीकाही अजित पवारांनी केली.
संघटनेत प्रत्येक पक्ष आपआपल्या परिने काम करतो…
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक निवेदन केलं, की आम्हाला खंजीर खुपसण्याचं काम झालं मला नाना पटोलेंचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं.
- कारण, नानाच कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले हे तुम्हाला माहितीये.
- ते भाजपामध्ये होते.
- तेवढ्यावेळपुरतं हेडलाईन मिळवण्यासाठी हे वाक्य त्यांना बरोबर वाटत असेल.
- पण, संघटनेत प्रत्येक पक्ष आपआपल्या परिने काम करत असतो.
जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करताना काळजी घ्यावी!
- “आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे.
- त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस काम करतेय.
- राज्य आणि देशस्तरावर निर्णय घेत असताना राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्णय घेतात.
- जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात.
- तिथली राजकीय, भौगोलिक परिस्थिती, तिथलं वातावरण, सर्वामध्ये राहाण्याकरता सर्वच राजकीय पक्षांमध्ये समन्वय असला तर हे प्रश्न निर्माण होत नाही.
- काँग्रेसनेही काही तालुक्यांमध्ये भाजपबरोबर संधान बांधलं.
- मी त्याला फार महत्त्व देऊ इच्छित नाही.
- जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करताना आपल्या वक्तव्याचा कुठे काही वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- सर्वांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.