मुक्तपीठ टीम
भाजपा सरकार देशातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते आहे. आणीबाणीनंतर जनतेनं इंदिरा गांधींचं सरकार पाडलं होतं. त्यानंतर मोरारजी देसाई यांचं सरकार जनतेनी पाडले, जनता सुजाण आहे, नेते चुकल्यावर धडा शिकवते असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीका केली आहे. शरद पवार पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत, तेथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले शरद पवार?
- शरद पवारांनी श्रीलंकेवर आलेल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले.
- ते म्हणाले की, श्रीलंकेता आर्थिक संकट निर्माण झाले असून, भारतात आणीबाणीनंतर जनतेने इंदिरा गांधींचे सरकार पाडले होते.
- त्यानंतर पुन्हा मोरारजींचे सरकार देखील पडले होते.
- जनता सुजाण आहे, नेते चुकल्यावर त्यांना धडा शिकवते, लोकांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.
शरद पवारांनी पुन्हा वाचली ‘तीच’ कविता
- भाजपाने बुधवारी (११ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत शरद पवारांवर सडकून टीका केली.
- या व्हिडीओत शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची एक कविता म्हटली होती.
- भाजपाच्या टीकेनंतर शरद पवार यांनी पुण्यात पुन्हा ती कविता वाचली आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलंय.
- आम्ही पाथरवट…’या कवितेत कष्टकऱ्यांच्या वेदना आहेत.
- मी सांगितलेलं काव्य जवाहर राठोड यांचं आहे.
- जवाहर राठोड एवढंच म्हणतात की माझ्या छन्नीने तुमच्या पाषाणातून आम्ही सगळे देव घडवले.
- तुम्ही आम्हालाच तिथे अडवत आहात.
- या कष्टकऱ्याच्या वेदना आहेत.”
- कष्टकऱ्यांच्या वेदना मांडणाऱ्या कवितेचा कोणी गैरप्रचार करत असेल, तर त्यांनी आवश्य करावा.
- लोक शोधतील हे कशात आलंय आणि जवाहर राठोड यांचं हे काव्य त्यांच्यापर्यंत पोहचेल.