मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलात ट्रेडमॅन पदांच्या एकूण ११५९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी पात्र उमेदवार हा १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय पदवीधर असणे आवश्यक.
वयोमर्यादा
०७ मार्च २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी ०५ वर्षे आणि ओबीसीसाठी ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल आणि ओबीसीसाठी २०५ रुपये तर एससी, एसटी आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: