मुक्तपीठ टीम
संपूर्ण जग कोरोनाशी गेले वर्षभर लढा देत आहे. स्वत:ची लढाई सुरु असतानाच भारत जगासाठी प्राणदाता ठरला आहे. या महामारीला नियंत्रित करण्यात भारताला केवळ यश आले नाही, तर जगाला त्यातून बाहेर काढण्यातही भारत प्रभावी भूमिका बजावत आहे. भारत आपली भूमिका दोन प्रकारे पार पाडत आहे. पहिले साधन म्हणजे भारताची लस इतर देशांत पाठविणे आणि दुसरे म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवॅक्स योजनेत आर्थिक योगदान देणे.
भारताने आतापर्यंत जगातील २० देशांना सुमारे २ कोटी ३० लाख डोस पाठविले आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये भारत आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांना अधिक लस पुरवणार आहे. भारताची ही वेगळी हेल्थ डिप्लोमसी म्हणजे आरोग्यदायी मुत्सद्देगिरी असल्याचं मानले जाते.
भारताच्या लस मुत्सद्देगिरीच्या बाबतीत पाकिस्तान वगळता भारताच्या सर्व शेजारी देशांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या कारवायांममुळे पाकिस्तानचा त्यात समावेश नाही. तसेच, भारतीय लस घेण्यासाठी पाकिस्तानकडून कोणताही अधिकृत पुढाकार घेण्यात आलेला नाही. याशिवाय आतापर्यंत भारताने आपली लस नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, फिलिपिन्स, इंडोनेशिया, ब्राझिल येथे पाठविली आहे. ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी लस मिळाल्यानंतर एक संस्मरणीय ट्विट केले ज्यामध्ये भगवान हनुमानाने औषधी वनस्पती आणल्याचे दिसून आले. भारतात लस पाठविल्याबद्दल आभार मानले गेले. डब्ल्यूएचओने १४५ देशांमध्ये कोवॅक्स पाठविण्याची घोषणा केली आहे.
लस डिप्लोमसीमध्ये भारताने शेजारी देशांना सर्वोच्च प्राधान्य दिले आणि त्यांना ही लस दिली. सीरम संस्थेने तयार केलेली कोविशील्ड लस आत्तापर्यंत परदेशात कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत बांगलादेशात २० लाख, म्यानमार १०.७ लाख, नेपाळ १० लाख, भूतान दीड लाख, मॉरिशस एक लाख, सेशल्स ५० हजार, श्रीलंका ५ लाख, बहरिन १ लाख, अफगाणिस्तानाला १ लाख, ५ लाख, बार्बाडोसला १ लाख आणि डोमिनिकन रिपब्लिकला ७० हजार लस दिली गेली आहे. व्यापारीदृष्ट्या ब्राझिलला सुमारे २० लाख, मोरोक्कोला ६० लाख, बांगलादेशला ५० लाख, म्यानमारला २० लाख, इजिप्तला ५० हजार, अल्जेरियाला ५० हजार, दक्षिण आफ्रिकेला दहा लाख, कुवेत आणि अमेरिकेत २ लाख डोस प्रदान केले गेले आहेत.
ज्या देशांना कोरोना लस पुरविली गेली आहे ते देश एकतर भारताच्या प्राधान्यक्रमाचा भाग होते किंवा त्यांनी यासाठी भारताला आवाहन केले होते. अलीकडेच कॅनडानेही भारताकडून कोरोना लसीची मागणी केली आहे.
पाहा व्हिडीओ: