मुक्तपीठ टीम
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्याबाहेर हनुमान चालीसा करण्याच्या इशाऱ्यानुसार ते मुंबईत आले आहेत. शिवसेनेकडून सुद्धा राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. सेनेकडून राणांना मातोश्रीवर येण्याचं प्रतिआव्हान देण्यात आलं आहे. अशावेळी राणांनी पत्रकार परिषद घेत शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणार आणि हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचं जाहीर केले आहे.
काय म्हणाले रवी राणा?
- कितीही विरोध झाला तरी उद्या सकाळी ९ वाजता मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार.
- आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
- आमदार रवी राणा यांनी म्हटले की, मातोश्रीवर हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी.
- राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालिसा वाचल्यानंतर दूर होईल.
- शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले.
- त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले.
- आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत.
- दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केलं असते.
- तर, एक वेळा नाही १०० वेळा वाचायला सांगितलं असते.
- आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही.
- आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही.
शिवसेना भाजपमुळेच सत्तेत…
- बाळासाहेबांच्या विचाराचे सैनिक असते तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिली असती.
- महाराष्ट्राच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी वाचू दिली असती.
- महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते आम्हाला विरोध करत आहेत.
- समस्त हिंदू हे पाहत आहेत.
- ज्यांना आम्ही मुंबईत आलोय हे माहीत नाही.
- ज्यांनी अमरावतीला थांबवण्याचा प्रयत्न केला.
- मुंबईला पाय ठेवून दाखवा असं म्हटलं होतं.
- मी पाय नाही, मी जिवंत उभा आहे.
- हनुमान चालिसा वाचण्यासाठी अशा धमक्या मिळत असतील तर एक नाही शंभर वेळा धमक्या सहन करेल पण आम्ही हनुमान चालिसा वाचणारच.
- शिवसेना भाजपमुळेच सत्तेत.
- मोदींचा फोटो लावून आमदार निवडून आणले.
- आमच्यावर भाजपाचं खापर फोडू नये.
- आम्ही स्वबळावर निवडून आलो आहोत.