मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे कधी राज ठाकरे यांच्यासाठी खाज शब्द वापरल्यानंतर आता लग्नविधीतील मंत्रोच्चारांबद्दल वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याबद्दल खेद व्यक्त केला. त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांबद्दलच विचारा, असं बजावलं. पत्रकारांनी नंतर दुसऱ्या ठिकाणी आग्रह केला असता, त्यांनी सर्वच राजकीय नेत्यांनी कोणत्याही समाजाचा अवमान होणार नाही याचे तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे, अशा कानपिचक्या दिल्या.
अजित पवारांची वेगळी भूमिका
- सध्या राजकीय नेत्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तनांची स्पर्धा दिसत आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते त्यात मागे नाहीत.
- आमदार अमोल मिटकरी तर सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत असतात.
- उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत.
- वादापासून दूर राहत ते आपलं म्हणणं मांडताना दिसत आहेत.
- आजही त्यांना एका टीव्ही पत्रकाराने आमदार अमोल मिटकरींच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी विचारलं असता त्यांनी त्यावर विचारू नका असं फटकारलं.
- त्यानंतर तुम्ही मला विचारायचं तर विकास कामांविषयी विचारा, असे सांगितले.
अमोल मिटकरींच्या निमित्ताने सर्वांनाच कानपिचक्या!
- त्यानंतर पुन्हा त्यांना विचारलं गेलं असता त्यांनी स्पष्ट शब्दात आपली वेगळी भूमिका मांडली.
- माझं स्वत:चं स्पष्ट मत आहे, कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने आपलं मत व्यक्त करताना कोणत्याही समाजाबद्दल.
- घटकाबद्दल अवमान होईल असं बोलू नये, नाराजी होईल, तारतम्य ठेवूनच वक्तव्य केले पाहिजे.
#तुळशीदास भोईटे यांच #सरळस्पष्ट भाष्य:
राणेंच्या नको त्या बोलण्याचा वाद: महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा न्यायालयाचा सल्ला राजकारणी पाळणार?
राणेंच्या नको त्या बोलण्याचा वाद: महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा न्यायालयाचा सल्ला राजकारणी पाळणार?