मुक्तपीठ टीम
आज शनिवार असूनही मध्य रेल्वेच्या प्रवासांना प्रचंद गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात शु्क्रवारी रात्री दोन एक्स्प्रेस गाड्यांची टक्कर झाली होती आणि याचा फटका मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले होते. यापैकी दोन डबे पु्न्हा रुळावर आणण्यात यश मिळाले आहे. तर अद्याप एक डबा रूळाच्या खाली आहे. हा डबा पुन्हा रूळावर आणण्यासाठी काही अवधी जाऊ शकतो. मध्य रेल्वेने सकाळी दिलेल्या माहितीनुसार, दुपारनंतर वाहतूक व्यवस्थित सुरू होण्याचा अंदाज आहे.
दुपारनंतर वाहतूक व्यवस्थित सुरू होण्याचा अंदाज
- मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
- अपघात झाल्याचे समजताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
- रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले.
- मध्य रेल्वेने सकाळी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारपर्यंत वाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे.
- ओव्हरहेड वायर आणि रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
- भायखळा ते माटुंगा दरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
- तर, मुंबईबाहेरून येणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन दादरपर्यंतच चालवण्यात आल्या.
अपघातामुळे लोकलवर परिणाम-
- मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकावर एक्सप्रेसचे तीन डबे घसरले होते.
- शुक्रवारी रात्री हा अपघात झाल्यानंतर अजूनही रेल्वे सेवा पूर्ववत झालेली नाही.
- घसरलेल्या एक्सप्रेसचे दोन डबे रुळावर आणण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आलं आहे.
- तर एक डब्बा रेल्वे रुळावर आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
- त्यामुळे त्याचा लोकल सेवेवर अजूनही परिणाम झालेला आहे.
- अप जलद मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली.
- सकाळी ८.१०. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणार्या काही लोकल आणि सीएसएमटी/दादरकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेस आता अप फास्ट मार्गावर नेल्या जातील. ८.२९ वाजता अप मार्गावरून (२२१०८)लातूर एक्स्प्रेस रवाना झाली आहे.
- डाऊन जलद वाहतूक भायखळा-माटुंगा मार्गे वळवली जात आहे.
- तर डाऊन जलद मार्गावरील वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी तीन ते चार तासांचा अवधी लागणे अपेक्षित आहे.
- त्यामुळे आज दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
- धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या पावणे दहा वाजता बंद करण्यात आल्या होत्या.
- पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली होती.