मुक्तपीठ टीम
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिसवसेना संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत घेत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपा भविष्यात एकत्र येणं शक्य नाही हे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना-भाजपा एकत्र येण्याच्या चर्चांना आता पुर्णविरोम लागला आहे. तसेच त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी कारवाई, एमआयएमची ऑफर, नवाब मलिक आणि देशमुखांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.
भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही…
- भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही.
- एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही.
- ज्या पद्धतीनं २५ वर्ष एकत्र काम केलं.
- ते विसरुन भाजपा सूडानं वागतंय.
- त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
- भाजपाचा भगवा आहे की नाही? भगव्याचा दांडा फक्त आमचाच आहे.
- भाजपाचा आहे की नाही माहित नाही.
एमआयएमने यूपीत भाजपाची बी टीम म्हणून काम केलं…
- जीना यांनी एक फाळणी केली तुम्ही रोज फाळणी करता, असा टोला लगावतानाच एमआयएमशी आघाडी होणार नाही.
- हे सांगणारा मी पहिला माणूस आहे.
- एमआयएमने उत्तर प्रदेशात भाजपाची बी टीम म्हणून काम केलं.
- त्यामुळे समाजवादी पार्टीचं मोठं नुकसान झालं.
- मतांची आकडेवारी पाहिल्यावर एमआयएम कुणासाठी काम करते हे दिसून येतं.
मलिकांचा राजीनामा घेणार नाही!
- नवाब मलीक यांचा राजीनामा घेणार नाही.
- अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चूक होती.
- अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाई घाईत झाला.
- थोडं संयमाने घ्यायला हवं होत.
केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय…
- ईडीच्या कारवायांबद्दल राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय.
- मध्यमवर्गीय व्यक्तीवर आक्षेप घेण्यात आले.
- पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होतात. अभिषेक बॅनर्जी यांना ईडीनं दिल्लीत बोलावलं. मी झुकणार नाही, असं बॅनर्जी म्हणाले.
- हा राजकीय गैरवापर होतो.
- भाजपाचं राज्य नसणाऱ्या ठिकाणीचं ईडीची कारवाई होते.
- सात वर्षात तेवीस हजार धाडी पडल्या.
- महाराष्ट्र, बंगालमध्ये सत्ता पाडू, असं भाजपाचं स्वप्न आहे.
- पण, आम्ही वाकणार नाही, मोडणारही नाही.
- आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.