मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्जावरती उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. तर प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एम.आर.ए.मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा ही दाखल झालेला आहे.
प्रवीण दरेकरांविरोधत गुन्हा दाखल!
- आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
- प्रवीण दरेकर हे ‘मजूर’ असल्याचा खोटा दावा करत मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत.
- मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचे अध्यक्ष होते.
- मात्र माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.
- सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले.
- त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत.
- याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला.
- शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला आहे असं धनंजय शिंदे यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराचे आरोप रोखण्यासाठीच आपल्यावर गुन्हा दाखल- प्रवीण दरेकर
- राज्य सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप रोखण्यासाठीच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- राज्य सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि वर्तमान कॅबिनेट मंत्री नवाब मलिक या दोघांना अटक झाल्याचा सूड उगवण्यासाठी आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण दरेकरांविरोधाती गुन्ह्याचं नेमकं प्रकरण समजून घेण्यासाठी खालील लिंक क्लिक करून नक्की वाचा…
प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा!
प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा का आणि कोणी दाखल केला? भाजपा म्हणते राजकीय सूडाने ताप, आप म्हणते नडलं पाप!!
विप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल होताच देवेंद्र फडणवीस आक्रमक
प्रवीण दरेकरांविरोधातील एफआयआरमध्ये काय म्हटलंय? एफआयआर जसा आहे तसा…
प्रवीण दरेकरांचं काय होणार? आपनं नोंदवलेल्या गुन्ह्यात आघाडी वाचवणार की अटक होणार?