Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता ४ वर्षाचं असणार पदवीचं शिक्षण, जाणून घ्या कसा असणार नवा अभ्यासक्रम…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, करिअर, घडलं-बिघडलं
0
UGC

मुक्तपीठ टीम

देशातील सर्व विद्यापीठांमध्ये चार वर्षांचा UG कार्यक्रम सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून पदवीपूर्व अभ्यास पूर्णपणे बदलणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच (UGC)ने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत चार वर्षांच्या UG कार्यक्रमासाठी विषय आणि अभ्यासक्रमांपासून क्रेडिट्सपर्यंतचा मसुदा तयार केला आहे. याला करिकूलर फ्रेमवर्क आणि क्रेडिट सिस्टम द फॉर ईयर अंडरग्रॅज्युएट प्रोग्रॅम असे नाव देण्यात आले आहे.

३ भागात ४ वर्षांचा UG कार्यक्रम

  • पहिलं म्हणजे रोजगाराला जोडण्यासाठी व्यावसायिक आणि इंटर्नशिप अनिवार्य करण्यात आली आहे.
  • दुसरं विद्यार्थ्यांना भारताचा समृद्ध वारसा, पर्यावरण, भाषा, शेजारी देशांसह जगातील देशांची परिस्थिती, सायबर सुरक्षा या समस्यांचा अभ्यास करणं अनिवार्य असेल.
  • तिसरं आणि शेवटचं विद्यार्थ्यांना विषयाव्यतिरिक्त सर्वांगीण विकास आणि ज्ञानाशी जोडणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
  • UGC च्या उच्चस्तरीय समितीने अशा प्रकारे अभ्यासक्रम तयार केला आहे की विद्यार्थ्याला विषयाचा अभ्यास करण्याव्यतिरिक्त २१व्या शतकातील गरजांचाही अभ्यास करता येईल.

 

पहिल्या तीन भागात विभागलेला विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम

  • विद्यार्थ्यांना सामायिक व प्रास्ताविक अभ्यासक्रमांचा अनिवार्य अभ्यास करावा लागणार आहे. त्यात विज्ञान, नाट्य, नृत्य, कला, संगीत, साहित्य, भाषा, पर्यावरण, मानवी मूल्ये, भारत जाणून घ्या, नैसर्गिक विज्ञान, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, जीवन कौशल्य, नागरिक म्हणून देश आणि समाजाप्रती आपली जबाबदारी, कर्तव्य हे विषय.
  • अहिंसा, प्रदूषण, हवामान बदल इ. कॉमन कोर्सचे २४ क्रेडिट आणि प्रास्ताविक कोर्सचे १८ क्रेडिट्स असतील.
  • प्रथम वर्ष पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, द्वितीय वर्ष डिप्लोमा, तृतीय वर्ष पदवी आणि चौथ्या वर्षी ऑनर्स पदवी व संशोधन पदवी.
  • सात वर्षांत प्रवेश-निर्गमन सुविधा उपलब्ध होईल.
  • दरवर्षी विद्यार्थ्याने किमान ४० क्रेडिट्स घेणे आवश्यक आहे.
  • तीन वर्षांच्या सामान्य पदवीसाठी १२० क्रेडिट आणि सन्मान आणि संशोधनासह चार वर्षांच्या UG प्रोग्रामसाठी १६० क्रेडिट आवश्यक आहे.
  • सातव्या आणि आठव्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्याला ऑनर्स आणि रिसर्चचा पर्याय मिळेल.

 

चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सत्रातील कोणते मुख्य विषय?

  • या सत्रात एक मुख्य विषय असेल आणि दोन किरकोळ विषयांचा पर्याय उपलब्ध असेल.
  • किरकोळ विषयांपैकी एक व्यावसायिक अभ्यासक्रम असेल.
  • मुख्य विषय ४८ क्रेडिट्सचा असेल आणि किरकोळ विषय १६-१६ क्रेडिट्सचा असेल.
  • पदवी अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना रोजगाराशी जोडणे हा त्याचा उद्देश आहे.
  • विद्यार्थी त्याच्या आवडीचा दुसरा किरकोळ विषय निवडू शकतो.

 

यूजी प्रोग्रॅम विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर

  • चार वर्षांचा यूजी पदवी कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारे फायदेशीर ठरणारा आहे.
  • चार वर्षांचा यूजी पदवी कार्यक्रम असलेले विद्यार्थी थेट पीएचडीसाठी पात्र असतील.
  • संशोधन क्षेत्रात स्वारस्य असलेले विद्यार्थी बहुविद्याशाखीय संशोधन करू शकतात किंवा अंतिम वर्षात एकाच विषयासह पदवी पूर्ण करू शकतात.

हे गुण शिकण्याच्या निकालात विशेष असतील

  • यामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे कौशल्य, सर्जनशील विचार, संवाद कौशल्य, नेतृत्व गुणवत्ता, विविध देश, राज्य, मानवी मूल्ये, तत्त्वे आणि इतर विषयांची माहिती विद्यार्थ्यांना असणं अनिवार्य आहे.
  • परीक्षेतही या मुद्यांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

Tags: Ministry of EducationUGCUnder Graduateनवा अभ्यासक्रमपदवीचं शिक्षण
Previous Post

प्रवीण दरेकरांना सोमवारपर्यंत अटकेपासून दिलासा, सत्र न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश

Next Post

डॉ सुनील पोखरणा यांची पदस्थापना राज्य शासन स्तरावरच : राजभवनाचे स्पष्टीकरण

Next Post
Bhagat Singh Koshyari canceled Suspension of Dr. Sunil Pokhrana

डॉ सुनील पोखरणा यांची पदस्थापना राज्य शासन स्तरावरच : राजभवनाचे स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!