मुक्तपीठ टीम
शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडित केला जाणार नसल्याची मोठी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली आहे. वीजतोडणी केलेल्या शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करणार असल्याचेही उर्जामंत्री यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महावितरणमध्ये वीज वितरण करताना वर्षाला २५ ते ३० हजार कोटींचा घोटाळा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर नितीन राऊतांनी ही घोषणा केली आहे.
काय म्हणाले नितीन राऊत?
- शेतकऱ्यांना प्राथमिकता द्यावी हे उद्दिष्ट समोर ठेवून आमच्या सरकारने मी मा. मुख्यमंत्री आणि उषमुंख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सांगू इच्छितो की, वीज पुरवठा खंडीत केलेल्या कृषी शेतकऱ्यांची जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय याठिकाणी घेण्यात येत आहे.
- तसेच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत आगामी तीन महिने वीज तोडणी आम्ही याठिकाणी तात्पुरता थांबवण्यात निर्णय घेतला आहे.
जवळपास २० ते २५ हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढू…
- मध्यरात्री आणि दुपारी ज्या काळात कुणी वीज घेत नसतं त्यावेळी ओपन मार्केटमधून वीज घ्यायची आणि शेतकऱ्यांच्या माथी मारायची.
- शेतकऱ्यांच्या वीजेचा एका युनिटचा खर्च ३ रुपयाच्यावर जातो. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरानं वीज देतो असं सांगितलं जातं.
- म्हणजे १ रुपये ६८ पैशानं वीज घेता.
- शेतकऱ्यांना ३ रुपयांना वीज देता.
- आणि त्याचा अधिभार उद्योगांवर टाकता हा ढोंगीपणा आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
- खासगी जलविद्युत प्रकल्पात तयार झालेली वीज २१ रुपये यूनिटनं खरेदी करायची.
- हा जवळपास २० ते २५ हजार कोटींचा घोटाळा जर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली नाही तर बाहेर काढू.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मानले ऊर्जामंत्र्यांचे आभार, दिवसा वीज पुरवठ्यावरही विचार!
- शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नांवर गेले काही दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे.
- शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्री ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली.
- शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणीला राज्य सरकारने स्थगिती दिल्याबद्दल त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचे आभार मानले आहेत. येथेच न थांबता दिवसा वीज पुरवठ्याचा निर्णय त्विरत घेण्याची मागणीही यावेळी राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.
- शेतकरी संघटनेच्या दिवसा वीज पुरवठा प्रस्तावावर तज्ज्ञांची समिती गठित केली असून अहवाल आल्यावर निर्णय घेऊ.
- असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावेळी राजू शेट्टी यांना दिले.