मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी नवी मुंबई येथील तळोजा एमआयडीसीत असलेल्या एका केमिकल कारखान्याला आग लागल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा मुंबईतील वर्सोवा भागामध्ये एका गॅस सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीदरम्यान गोदामातील सिलेंडरचे स्फोट होतच असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. मात्र, आता आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे.
Mumbai: Four people injured in a cylinder blast at a cylinder storage godown on Yari Road in Andheri (W); all injured shifted to a city hospital
— ANI (@ANI) February 10, 2021
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास वर्सोवातील यारी रोड येथे असलेल्या गॅस सिलिंडरच्या गोदामाला आग लागली. या आगीत आतापर्यंत ४ जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात रहिवाशी वस्ती व शाळा असल्यानं तिथील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
Mumbai: Four people injured in fire due to cylinder blast at a storage godown on Yari Road, Versova Andheri (W) pic.twitter.com/iQhpregyWH
— ANI (@ANI) February 10, 2021
दरम्यान, ही आग कश्यामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण प्राथमिक अंदाजावरून सदर आग शार्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे.