मुक्तपीठ टीम
रशिया-युक्रेनच्या युद्धादरम्यान हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, वैद्यकिय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये जात आहेत. भारतामध्ये पंच्यान्नव टक्के गुण मिळून देखील प्रवेश मिळत नाही. तिथे साठ टक्क्यांना प्रवेश मिळतो. आज हजारो मुलं ही युक्रेनमध्ये अडकलीयत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. तसेच अशा परिस्थितीत पंतप्रधान रविवारी पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत, असा टोलाही त्यांनी लगावला.
अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज…
- युक्रेन हा अतिशय सुंदर देश.
- आपल्या इथे मेडिकल साठी प्रवेश मिळत नाही म्हणून विद्यार्थी तिथे जातात.
- रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय.
- मी काही विद्यार्थ्यांशी बोललोय.
- केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत.
- या संकटात तुम्ही काय केलं, काय नाही केलं याची चर्चा करण्याची ही वेळ नाही पण केंद्र सरकारने यात अधिक लक्ष घालण्याची गरज आहे.
- पुणे महापालिकेच्या अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे.
उद्या काही अडचण आल्यास आपल्यालाच निस्तरावी लागणार…
- पंतप्रधान मोदी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनाबरोबरच
- दुसरीकडे जायका प्रकल्पाच्या माध्यमातूना मुळा मुठा नदी नदीसुधार योजनेचा प्रकल्प राबवला जाणारा आहे.
- मात्र याची काळजी वाटते कारण नदीच पात्र अरूंद होऊन रस्ते आणि फिरायचं ठिकाण होणार आहे.
- मी काही इंजीनिअर नाही.
- पण मला माहिती आहे की, खडवासलाच्या वरती टेमघर आहे.
- त्याच्या वरती पानशेत आहे, त्याच्या वरसगाव आहे.
- उद्या ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल.
- त्यामुळे हा कार्यक्रम झाला की आम्ही जलसंपदा विभागातील तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत.
- काही त्रुटी असल्यास राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत आणि गरज पडल्यास महापालिकेलाही विनंती करणार आहोत.
- पंतप्रधानांचे आपण स्वागत करुया कारण ते देशाचे प्रमुख आहेत.
- पण उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे