मुक्तपीठ टीम
२५ फेब्रुवारी रोजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांच्या घरीर प्राप्तिकर विभागामार्फत छापे पडले. या छाप्यादरम्यान या प्रकरणी मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठविल्याचे ट्विट समीत ठक्कर याला चांगलेच महागात पडले आहे. या ठक्कर विरोधात इक्बाल सिंह चहल यांच्या वतीने आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे ठक्कर याचे ट्विट
मागील आठवडय़ात यशवंत जाधव यांच्या घरासह ३५ ठिकाणी प्राप्तीकर खात्याने छापा मारला होता. या प्रकरणी इक्बाल सिंह चहल यांची प्राप्तीकर खात्यामार्फत चौकशी करण्यात येणार असून त्यांना प्राप्तीकर खात्यामार्फत समन्स बजावण्यात आले आहे, अशा आशयाटे ट्विट ठक्कर यांनी शुक्रवारी केले होते.
चहल यांच्याकडून ट्वीटची गंभीर दखल-
- प्राप्तीकर खात्याकडून आपल्यावर कोणतेही समन्स बजावण्यात आलेले नाही.
- आपल्याबद्दल अफवा उठविणाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल.
- या प्रकरणी मनपाचे विधी अधिकारी सुनील सोनावणे यांनी शुक्रवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये ठक्कर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
- ठक्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे सोनावणे यांनी म्हटले आहे.