मुक्तपीठ टीम
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात गुरुवारी एका शेतकरी कुटुंबावर जमिनीसाठी हल्ला करण्यात आला होता. या शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठी मारहाण करण्याऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मनसे आमदार राजू पाटील प्रयत्न करत होते. अखेर ५ दिवसानंतर शीळ-डायघर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डोंबिवलीमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
- कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांतील मोकाशी पाडा, दहीसर आणि दहिसर मोरी या तीन गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांची २८५ एकर शेती आहे.
- .+या शेतीवर विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत.
- या महत्वाच्या जागेवर सर्व बिल्डरांचा डोळा आहे.
- मागच्या गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास चार ते पाच वाहनांतून काही जण लाठ्याकाठ्या घेऊन आले आणि मोकाशी पाड्यातील माजी पोलीस पाटील एकनाथ मोकाशी आणि त्यांचा मुलगा प्रशांत मोकाशी याला मारहाण केली.
- इतकेच नव्हे तर महिलांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
- यात एकनाथ मोकाशी यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे.
- तर प्रशांत मोकाशी याच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
- याबाबत वैद्यकीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा पोलिसांनी गुन्हा केला नव्हता.
- याप्रकरणी शेतकरी कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
- शेतकरी कुटुंबीयांसोबत जवळपास ६ तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला.
- पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले.
- यावेळी मनसे आमदार यांनी पोलीस गुन्हा दाखल करत नाही तर पीडित कुटुंब न्यायालयात धाव घेणार असे सांगितले होते.
- अखेर ५ दिवसानंतर का होईना डायघर पोलिसांनी शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे येथील डायघर पो.स्टे. हद्दीत एका शेतकरी कुटूंबाला मारहाण झाली तरीही पोलिस FIR दाखल करत नाहीत ! का तर तो आरोपी सेनेचा पदाधिकारी आहे म्हणून ? हा महाराष्ट्र आहे की बिहार ? @maha_governor @DGPMaharashtra @Dwalsepatil @AjitPawarSpeaks @OfficeofUT pic.twitter.com/ZPVE9Dqtnv
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) February 5, 2022
कुटुंबियांनी राजू पाटलांचे मानले आभार
- शीळ-डायघर पोलिसांनी डोंबिवलीमधील शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांच्यासह १५ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
- हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी शेतकरी एकनाथ मोकाशींलह पोलीस ठाण्यात भेट दिली.
- कुटुंबियांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आहेत आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
- गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना धन्यवाद देत पोलिसांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मनसे आमदार पाटील यांनी केली आहे.