मुक्तपीठ टीम
मध्ये रेल्वेवर ०४, ०५ आणि ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे ते दिवा दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. दरम्यान यावेळी ३५० लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ११७ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अनेक गाड्या रद्द
- रेल्वेकडून नवीन मार्गिका सुरू करण्यासाठी आणि काही पायाभुत सुविधांचे काम करण्यासाठी रेल्वे विभागाकडून मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
- येत्या ८ फेब्रुवारीला तुमच्या प्रवासाठी नवीन मार्गिका येणार आहे.
- ती ठाणे-दिवा दरम्यान दहावी मार्गिका असणार असून त्यामुळे मुंबईकरांचा आणि ठाणेकरांचा प्रवास सुकर होणार आहे.
- त्यासाठी ४ फेब्रुवारी रात्री १२ वाजल्यापासून ते ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मेगा ब्लॉक असेल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
- या मेगाब्लॉकमुळं ३५० लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
- तसेच ११७ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- नवीन मार्गिका तयार करण्यासाठी इतर पायाभूत कामे करण्यासाठी ७२ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
लोकलचं वेळापत्रक
- मेगाब्लॉक सुरू झाल्यानंतर रात्री ११.१० नंतर पुढचं काम होईपर्यंत कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या लाबंपल्ल्याच्या गाड्या आणि लोकल कल्याण आणि मुलुंड दरम्यान धिम्या मार्गाकडे वळवल्या जातील.
- विशेष म्हणजे या गाड्या ठाणे स्थानकात थांबवल्या जाणार नाहीत.
- ६ फेब्रुवारीनंतर येणाऱ्या जलद गाड्या आणि कळवा प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि नवीन बोगद्याच्या एका मार्गाने चालवण्यात येतील.
काही गाड्यांचा प्रवास पवनेल पर्यंत असेल. - ४ फेब्रुवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघणाऱ्या आणि ठाण्या दरम्यान पोहचणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या ७ फेब्रुवारीपर्यंत कल्याण स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक ५ या मार्गावर वळवण्यात येतील.
प्रवासांच्या सोयीसाठी मनपा, प्रशासन सज्ज
- प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून ठाणे मनपाकडून आणि कल्याण मनपाकडून अधिक बस चालवण्यात येतील, कारण हा खूप मोठा मेगा ब्लॉक असल्याने लोकांचे हाल होऊ नये याची काळजी मनपाकडून घेतली जाईल.
- या मेगाब्लॉक दरम्यान पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.