Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाणे-दिवा दरम्यान तीन दिवसांचा मेगाब्लॉक, ३५० लोकल ट्रेन रद्द, ११७ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
local

मुक्तपीठ टीम

मध्ये रेल्वेवर ०४, ०५ आणि ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे ते दिवा दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. दरम्यान यावेळी ३५० लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ११७ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

अनेक गाड्या रद्द

  • रेल्वेकडून नवीन मार्गिका सुरू करण्यासाठी आणि काही पायाभुत सुविधांचे काम करण्यासाठी रेल्वे विभागाकडून मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
  • येत्या ८ फेब्रुवारीला तुमच्या प्रवासाठी नवीन मार्गिका येणार आहे.
  • ती ठाणे-दिवा दरम्यान दहावी मार्गिका असणार असून त्यामुळे मुंबईकरांचा आणि ठाणेकरांचा प्रवास सुकर होणार आहे.
  • त्यासाठी ४ फेब्रुवारी रात्री १२ वाजल्यापासून ते ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मेगा ब्लॉक असेल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
  • या मेगाब्लॉकमुळं ३५० लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
  • तसेच ११७ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • नवीन मार्गिका तयार करण्यासाठी इतर पायाभूत कामे करण्यासाठी ७२ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

 

लोकलचं वेळापत्रक

  • मेगाब्लॉक सुरू झाल्यानंतर रात्री ११.१० नंतर पुढचं काम होईपर्यंत कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या लाबंपल्ल्याच्या गाड्या आणि लोकल कल्याण आणि मुलुंड दरम्यान धिम्या मार्गाकडे वळवल्या जातील.
  • विशेष म्हणजे या गाड्या ठाणे स्थानकात थांबवल्या जाणार नाहीत.
  • ६ फेब्रुवारीनंतर येणाऱ्या जलद गाड्या आणि कळवा प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि नवीन बोगद्याच्या एका मार्गाने चालवण्यात येतील.
    काही गाड्यांचा प्रवास पवनेल पर्यंत असेल.
  • ४ फेब्रुवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघणाऱ्या आणि ठाण्या दरम्यान पोहचणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या ७ फेब्रुवारीपर्यंत कल्याण स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक ५ या मार्गावर वळवण्यात येतील.

 

प्रवासांच्या सोयीसाठी मनपा, प्रशासन सज्ज

  • प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून ठाणे मनपाकडून आणि कल्याण मनपाकडून अधिक बस चालवण्यात येतील, कारण हा खूप मोठा मेगा ब्लॉक असल्याने लोकांचे हाल होऊ नये याची काळजी मनपाकडून घेतली जाईल.
  • या मेगाब्लॉक दरम्यान पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Tags: Central RailwayMegablockThane-diwa Railwaylineठाणे मनपाठाणे-दिवा रेल्वेमार्गमध्ये रेल्वेमेगाब्लॉक
Previous Post

रयत शिक्षण संस्थेत शिक्षण संचालक, प्राध्यापक पदांसाठी २४३ जागांवर भरती

Next Post

गोव्यात राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; नवाब मलिक ९ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रचारात…

Next Post
Nawab Malik

गोव्यात राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; नवाब मलिक ९ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रचारात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!