मुक्तपीठ टीम
३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाली सुरुवात होणार असून मोदी सरकारने देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची शुक्रवारी नियुक्ती केली आहे. शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाल संपल्यानंतर या पदावर कुणीचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यानंतर व्ही. अनंत नागेश्वरन यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सुब्रमण्यम हे ३ वर्षे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार होते.
व्यवसाय आणि आर्थिक घडामोडींचा विस्तृत अनुभव
- डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांना व्यवसाय आणि आर्थिक बाबींचा मोठा अनुभव आहे.
- त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), अहमदाबाद येथून १९८५ मध्ये एमबीए केले.
- त्यानंतर, १९९४ मध्ये, त्यांनी मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून वित्त विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली.
- स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी अनेक खाजगी संपत्ती व्यवस्थापन संस्थांसाठी संशोधन कार्यात मोठी भूमिका बजावली आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा एक भाग
- ते ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०१९ पर्यंत IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन होते.
- ऑक्टोबर २०१९ मध्ये, त्यांना भारतातील पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य बनवण्यात आले.
- ही जबाबदारी त्यांनी दोन वर्षे पार पाडली.
- कोरोनाच्या या काळात नागेश्वरन यांची सीईए म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- देश पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर येईल आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारेल आणि वाढेल, अशी अपेक्षा आहे.
- भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची धोरणे बनवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल.
चार जण होते स्पर्धेत
- प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार के व्ही सुब्रमण्यन हे गेल्या वर्षी पदावरून पायउतार झाल्यानंतर सरकारने सीईएसाठी चार नावांची निवड केली होती.
- नागेश्वरन व्यतिरिक्त, या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक पामी दुआ आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER)चे महासंचालक पूनम गुप्ता यांचा समावेश होता.