Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dr V Anantha Nageswaran

मुक्तपीठ टीम

३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाली सुरुवात होणार असून मोदी सरकारने देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची शुक्रवारी नियुक्ती केली आहे. शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाल संपल्यानंतर या पदावर कुणीचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यानंतर व्ही. अनंत नागेश्वरन यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सुब्रमण्यम हे ३ वर्षे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार होते.

 

व्यवसाय आणि आर्थिक घडामोडींचा विस्तृत अनुभव

  • डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांना व्यवसाय आणि आर्थिक बाबींचा मोठा अनुभव आहे.
  • त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), अहमदाबाद येथून १९८५ मध्ये एमबीए केले.
  • त्यानंतर, १९९४ मध्ये, त्यांनी मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून वित्त विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली.
  • स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी अनेक खाजगी संपत्ती व्यवस्थापन संस्थांसाठी संशोधन कार्यात मोठी भूमिका बजावली आहे.

 

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा एक भाग

  • ते ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०१९ पर्यंत IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन होते.
  • ऑक्टोबर २०१९ मध्ये, त्यांना भारतातील पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य बनवण्यात आले.
  • ही जबाबदारी त्यांनी दोन वर्षे पार पाडली.
  • कोरोनाच्या या काळात नागेश्वरन यांची सीईए म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • देश पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर येईल आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारेल आणि वाढेल, अशी अपेक्षा आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची धोरणे बनवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल.

 

चार जण होते स्पर्धेत

  • प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार के व्ही सुब्रमण्यन हे गेल्या वर्षी पदावरून पायउतार झाल्यानंतर सरकारने सीईएसाठी चार नावांची निवड केली होती.
  • नागेश्वरन व्यतिरिक्त, या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक पामी दुआ आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER)चे महासंचालक पूनम गुप्ता यांचा समावेश होता.

Tags: Chief Economic AdvisorDr V Anantha NageswaranIndiaआर्थिक सल्लागारके. व्ही. सुब्रमण्यमडॉ. व्ही अनंत नागेश्वरभारत
Previous Post

रेलटेल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये ६९ जागांवर नोकरीची संधी

Next Post

अरे व्वा! पोलीस खात्यात ७ हजार २०० पदांसाठी भरती!

Next Post
maharashtra police (2)

अरे व्वा! पोलीस खात्यात ७ हजार २०० पदांसाठी भरती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!