मुक्तपीठ टीम
भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात इंजिन ड्रायव्हर, सारंग लास्कर, स्टोअर कीपर ग्रेड-२, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर, फायरमन, आयसीई फिटर (स्किल्ड), स्प्रे पेंटर, एमटी (फिटर) एमटी मेकॅनिकल, मल्टी टास्किंग स्टाफ माळी, मल्टी टास्किंग स्टाफ शिपाई, मल्टी टास्किंग स्टाफ डॅफ्ट्री, मल्टी टास्किंग स्टाफ स्वीपर, शीट मेटल वर्कर सेमी स्किल्ड, इलेक्ट्रिकल फिटर, लेबर या पदांसाठी एकूण ८० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) सारंग प्रमाणपत्र
- पद क्र.३- १) १२वी उत्तीर्ण २) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव
- पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड व हलके वाहनचालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
- पद क्र.५- १०वी उत्तीर्ण
- पद क्र.६- १०वी उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा आयटीआय (आयसीई फिटर)+ १ वर्ष अनुभव किंवा ४ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) अप्रेंटिस पूर्ण
- पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील २ वर्षे अनुभव
- पद क्र.९- १) १०वी उत्तीर्ण २) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये दोन वर्षांचा अनुभव
- पद क्र.१० आणि ११ साठी – १) १०वी उत्तीर्ण २) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव
- पद क्र.१२- १) १०वी उत्तीर्ण २) कोणत्याही फर्ममध्ये दोन वर्षे क्लीनशिपचा अनुभव
- पद क्र.१३- १) १०वी उत्तीर्ण/ आयटीआय २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.१४- १) १०वी उत्तीर्ण/ आयटीआय २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.१५- १) १०वी उत्तीर्ण/ आयटीआय २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.