मुक्तपीठ टीम
नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे ३१ जानेवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात पार पडणार असून १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. ११ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल तर दुसरा १२ मार्चला सुरु होणार आहे. तर, ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
दोन टप्प्यात होणार अधिवेशन
- देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
- देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत काळजी घेत हे अधिवेशन घ्यावे लागणार आहे.
- त्या पाश्वर्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.
- ११ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल तर दुसरा १२ मार्चला सुरु होणार आहे. आणि ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
लोकसेभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून पाहणी
- मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवनाची पाहणी केली होती.
- संसद सदस्य आणि आरोग्य विषयक खबरदारीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेताल होता.
- ओम बिर्ला यांनी त्यावेळी ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या खासदारांची विशेष दक्षता घेण्यात यावी.
- त्यादृष्टीनं कोरोना प्रतिबंधक यंत्रणेचा आढावा देखील घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.