Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कमळ सोडा, सायकलवर बसा, सपाची उमेदवारी पक्की!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Akhilesh Yadav

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. दरम्यान भाजपाला धक्का देत अनेक बडे नेते भाजपा सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करत आहेत. अखिलेश यादव यांनी कमळ सोडा, सायकलवर बसा, सपाची उमेदवारी मिळवा असे आवाहन केले आहे. सपा-आरएलडी युतीने आपल्या पहिल्या यादीद्वारे पक्षांतर करणाऱ्यांना संदेश दिला आहे. जर तुम्ही मजबूत आहात आणि तुमच्यासोबत जनमत आहे तर तुम्हाला तिकीट मिळू शकते. या यादीत आतापर्यंत सहा पक्षांतर केलेल्या नेत्यांना तिकीट मिळाले आहे. त्यापैकी दोन विद्यमान आमदार आहेत. आतापर्यंत केवळ २९ जागांची यादी जाहीर झाली आहे. शुक्रवारी आणखी नावांची यादी जाहीर होईल.

 

बसपाच्या अस्लम चौधरींचा धौलानामधून विजय झाला आहे. सपाने त्यांना येथून उमेदवारी दिली आहे. भाजपमधून आरएलडीमध्ये आलेले आमदार अवतार सिंह भडाना हे चार वेळा खासदार राहिलेत. हरियाणातही त्यांचा चांगला प्रभाव आहे. ते आता आरएलडीचे उमेदवार आहेत. काँग्रेस सोडून आरएलडीमध्ये दाखल झालेले गजराज सिंहनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. गजराज सिंह हापूरमधून चार वेळा निवडणूक जिंकले आहेत.

 

आरएलडीमध्ये बसपा सोडून गेलेल्या नेत्यांना पसंती

  • बसपा सोडून हाजी युनूसही आरएलडीचे बुलंदशहरमधून उमेदवार झाले आहेत.
  • उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या कोकाब हमीद यांचा मुलगा अहमद हमीद यांना आरएलडीने बागपतमधून उमेदवारी दिली आहे.
  • त्यांनी बागपतमधूनच बसपाकडून मागची निवडणूक लढवली होती.
  • कोकब हमीद अनेक वेळा बागपतमधून आमदार होते.
  • आघाडीच्या यादीत सर्व जातीय समीकरणे लक्षात घेतली, तर कमी-अधिक प्रमाणात सर्वच वर्ग जुळवून घेतले गेलेत.
  • यात जाट, गुज्जर आहेत. तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, मागास आणि दलितवर्गाचाही समावेश आहे.

 

धर्मेंद्र मलिक यांनी अखिलेश यांची घेतली भेट

  • भारतीय किसान युनियन पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा डावपेच बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.
  • बीकेयू प्रमुख महेंद्रसिंग टिकैत यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र मलिक यांनी लखनऊमध्ये अखिलेश यादव यांची भेट घेतली.
    बीकेयू ही बिगर राजकीय संघटना आहे.
  • धर्मेंद्र मलिक आणि इतर काहींना पश्चिम उत्तर प्रदेशातून आरएलडी किंवा सपाकडून तिकीट मिळू शकते, असे मानले जात आहे.

Tags: akhilesh yadavBahujan Samaj PartyBJPsamajwadi partyअखिलेश यादवबसपाभाजपासमाजवादी पक्ष
Previous Post

दिवंगत मनोहर पर्रिकरांच्या मुलाचा भाजपावर हल्ला: “भाजपा गुन्हेगाराला उमेदवारी देतेय!”

Next Post

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

Next Post
parliment

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!