मुक्तपीठ टीम
१० महिन्यानंतर १ फेब्रुवारीपासून मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन सर्वांसाठी पुन्हा सुरु झाली आहे. याठिकाणी लोकलमध्ये चढण्याआधी एका प्रवाश्यानं ट्रेनवर डोकं ठेवून नमस्कार केला आहे. कोणीतरी हा फोटो कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला.
१ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास मुंबईतील सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनवर काढलेला हा फोटो आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा भावनात्मक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की,’भारताचा आत्मा, मी प्रार्थना करतो की आपण हे कधीही गमावणार नाही.’
सोशल मीडिया युजर @Madan_Chikna यांनी कमेंट केली आहे की, मनाला स्पर्श करणारा हा फोटो आहे. एक प्रवाशी लोकलमध्ये चढण्याआधी ट्रेनचा नमस्कार करत आहे. कारण तब्बल ११ महिन्यांनी मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू झाली.
आतापर्यंत या फोटोला ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून ३६८ पेक्षा जास्त ट्विट्स या फोटोवर आले आहेत.