मुक्तपीठ टीम
१०वी, १२वी पास आणि पदवीधरांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ESICमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी आली आहे. ESICने अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), स्टेनोग्राफर (STENO) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी ESICच्या अधिकृत वेबसाइट www.esic.nic.inला भेट द्यावी. तेथे भरती अधिसूचित केली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२१ आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज प्रक्रिया सुरूवात: १५ जानेवारी २०२२
- ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख: १५ फेब्रुवारी २०२२
कोण अर्ज करु शकतं?
- पद – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)
पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर अर्ज करू शकतात.
- पद – स्टेनोग्राफर (STENO)
पात्रता – १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. शिवाय त्यांना टायपिंगचे कौशल्य आवश्यक आहे.
- पद – मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
पात्रता – १०वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
- UDC आणि STENO: १८ ते २७ वर्षे
- MTS: १८ ते २५ वर्षे
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.
- इच्छूक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी ESICच्या esic.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
वेतन
- UDC आणि STENO :
25,500-81,100 (7व्या वेतन आयोगानुसार)
- MTS
18,000-56,900 (7व्या वेतन आयोगानुसार)
शैक्षणिक पात्रता
- UDC
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष पात्रता.
ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- STENO
१२वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष पात्रता.
शब्दलेखन: १० मिनिटे @ ८० शब्द प्रति मिनिट.
ट्रान्सक्रिप्शन: ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी) (केवळ संगणकावर)
- MTS
मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण.
लिंक क्लिक करा:
https://www.esic.nic.in/attachments/publicationfile/eeb2a55da8116660a10e8cebeb6c206e.pdf