Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नविन वर्षात अन्नदात्याला सुगीचे दिवस येवो! कोरोनाचे अरिष्ट जावो! महागाईतून सुटका होवो!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा

January 1, 2022
in घडलं-बिघडलं, विशेष
0
nana patole new pic

मुक्तपीठ टीम

सरत्या वर्ष २०२१ हे देशातील अन्नदात्यासाठी अत्यंत कष्टदायी व दुःखद असे ठरले. काळे कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले असले तरी त्यासाठी शेतक-याला मोठा संघर्ष व त्याग करावा लागला. या संघर्षात ७०० शेतकरी बांधवांचा बळी गेला. अतिवृष्टी व अवकाळीने बळीराजाचे अतोनात नुकसान केले. सरत्या वर्षातील हे कठीण प्रसंग सरत्या वर्षाबरोबर संपू दे व बळीराजाला नवीन वर्षात भरभराट येवो, त्याला सुगीचे दिवस येवो, अशी प्रार्थना करून त्यासाठी प्रयत्न करुयात, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

 

पटोले पुढे म्हणाले की, शेतक-यांबरोबरच सामान्य जनता पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलाच्या किमती गगणाला भिडल्याने मेटाकुटीस आली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे महागाईचे संकट या दुष्टचक्रात जनता होरपळून निघाली आहे. नवीन वर्षात तरी महागाई कमी होऊन जनतेला दिलासा मिळावा. तरुण वर्गांसमोर असलेले  बरोजगारीचे संकट दूर होऊन रोजगाराच्या संधी वाढाव्यात. कोरोनाच्या संकटावर मागील वर्षात मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आपल्याला यश आले परंतु ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे पुन्हा संकट उभे ठाकले आहे. सरकारने कोरोना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन करू व ओमायक्रॉनच्या संकटावरही मात करु आणि अस्मानी, सुलतानी संकटातून जनतेची सुटका व्हावी अशी प्रार्थना करू.

 

नवीन वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धी व आरोग्यदायी ठरो, अशा शुभेच्छा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी दिल्या आहेत.


Tags: Congresshappy new yearnana patoleकाँग्रेसनवीन वर्षाच्या शुभेच्छानाना पटोले
Previous Post

ESICमध्ये UDC, MTS आणि इतर पदांसाठी मोठी भरती, १०वी, १२वी पास आणि पदवीधरांसाठी संधी

Next Post

खासगी वेबसाइटवर शिक्षकभरतीच्या जाहिराती! आपला संबंध नसल्याचा सरकारी खुलासा

Next Post
samagra shiksha website

खासगी वेबसाइटवर शिक्षकभरतीच्या जाहिराती! आपला संबंध नसल्याचा सरकारी खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!