मुक्तपीठ टीम
गोवा मुक्ती दिनी नौदलाच्या ‘ प्रकल्प १५ बी ’अंतर्गत आयएनएस ‘मॉरमुगाओ’ ही दुसरी विनाशिका पहिल्या कठीण सागरी चाचण्यांसाठी रविवारी रवाना झाली. सन २०२२ च्या जुनमध्ये ही नौका नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल करण्याचा नौदलाचा मानस आहे. त्यानुसार या विनाशिकेच्या असंख्य सागरी चाचण्यांना सुरुवात झाली आहे. या चाचण्या सुरु करण्यामागे इैतिहासिक कारण आहे.
भारतीय नौदलाची दुसरी स्वदेशी स्टेल्थ विनाशक ‘मॉरमुगाओ’ २०२२० च्या मध्यात कार्यान्वित करण्याच्या योजनेनुसार ही नौका पहिल्या सागरी कठीण चाचण्यांसाठी निघाली आहे. ही विनाशिका सागरी चाचण्यांसाठी रवाना झाली असली तरी, १९ डिसेंबर ही कदाचित सर्वात योग्य तारीख आहे. कारण आजपासून भारत देश पोर्तुगीजांच्या राजवटीपासून मुक्त झाला. त्या दिवसाच्या म्हणजेच गोवा मुक्तीची ६० वर्षे साजरी करत आहे.
भारतीय नौदलाने या ‘मुक्ती संग्राम’ मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आणि या नौकेचे नाव ‘मॉरमुुगाओ’ या सागरी राज्याला समर्पित केले आहे. यामुळे भारतीय नौदल आणि गोव्यातील नागरिक, रहिवासी यांच्यातील संबंध केवळ वाढणार नाहीत, तर नौदलाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेशी या विनाशिकेची ओळख कायमस्वरूपी जोडली जाईल शिवाय ‘मेक इन इंडिया’ची मोहोर यानिमित्ताने उमटली गेली असून, या मागील गोव्याशी निगडित असलेला इतिहास कायम कोरला गेला आहे.
नौदलातर्फे ‘प्रकल्प १५ बी ’अंतर्गत विनाशिकांचा ताफा उभारला जात आहे. त्याचा एक भाग म्हणून मुंबईतील ‘माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे ‘मॉरमुगोवा’ सह अन्य विनाशिकांची निर्मिती सुरु आहे. या अत्याधुनिक नौकांमध्ये अनेक विशिष्ट स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे आणि ते ‘आत्मनिर्रभर भारत’याचे द्योतक आहे शिवाय ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला यामुळे जोर आणि प्रोत्साहन दिले गेले आहे.
‘मॉरमुगाओ’ येत्या काळात भारतीय नौदलाच्या लढाऊ क्षमतेत लक्षणीय भर घालेल. ‘आयएनएस विशाखापट्टणम’आणि चौथी पी ७५ पाणबुडी ‘आयएनएस वेला’ यांच्याही नोव्हेंबर २०२१ मध्ये नुकत्याच सागरी चाचण्यांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे, ‘मॉरमुगाओ’ च्या सागरी चाचण्यांची सुरुवात ही माझगाव गोदीची (एमडीएसएल) अत्याधुनिक क्षमता आणि आधुनिक तसेच मजबूत स्वदेशी लढाऊ नौकांच्या बांधणी परंपरेची साक्ष आहे.