Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ईडी, सीबीआय, एनसीबीची चिलखतं उतरवा, आमच्याशी लढा, शिवसेनेशिवाय भाजपाचे १०५ अशक्य!”

अमित शाहांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shivsena sanjay raut replies amit shah strongly

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी शाह यांच्या ठाकरेंनी राजीनामा देऊन तिन्ही पक्षांनी पुन्हा लढावं, या आव्हानावर भाजपालाच प्रतिआव्हान दिलं आहे, “ईडी, सीबीआय, एनसीबी ही भाजपाची तिहेरी चिलखतं आहेत. त्यांना बाजूला ठेवा आमच्याशी लढा. आपण म्हणताय ना, राजीनामा द्या आणि आमच्याशी आमने-सामने लढा.”
महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय भाजपला १०५ जागा अशक्य आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

 

आघाडीचे नेते का संतापलेत?

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाषणात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान दिले.
  • मुख्यमंत्री ठाकरेंवर सत्तावाटपावरून खोटे बोलल्याचा आरोप करत शिवसेनेला डिवचले.
  • राजीनामा देऊन मैदानात या, असे म्हणत आघाडीला आव्हान दिले.

तीन-तीन चिलखतं घालून फिरतायत…

  • संजय राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर
  • केंद्राने प्रयत्न करून सुद्धा सरकारचा एक कवचा सुद्धा उडालेला नाहीय, याचे दुःख आम्ही समजू शकतो.
  • तुमच्या सर्व यंत्रणा फेल गेलेल्या आहेत. आपण म्हणताय ना, राजीनामा द्या आणि आमच्याशी आमने-सामने लढा.
  • मी सांगतो तीन-तीन चिलखत घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय ना…सीबीआय, ईडी, एनसीबी….ही चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा.
  • आपण म्हणताय ना, राजीनामा द्या आणि आमच्याशी आमने-सामने लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत.
  • आम्ही असे पाठीमागून कुणावर हल्ले-प्रतिहल्ले करत नाही.

शिवसेनेशिवाय भाजपाच्या १०५ जागा अशक्य

  • शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे.
  • आम्हाला शिकवू नका, समोरून लढा म्हणून. आम्ही समोरूनच लढतो. आतापर्यंत समोरूनच लढत आलेलो आहोत.
  • विधानसभेच्या निवडणुकीत ५०-५० टक्के सत्तेचे सूत्र ठरले होते, या वक्तव्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
  • शिवाय महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय भाजपला १०५ जागा अशक्य आहे.

 

२०१४मध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचं कारस्थान कुणाचं होतं?

  • आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत. २५ वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो.
  • हिंदुत्ववादी होतो. असं असताना २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेला बाजूला सारा असं कोणी सांगितलं होतं?
  • शिवसेनेला दूर ठेवण्याचं कट कारस्थान कुणाचं होतं?
  • महाराष्ट्राची सत्ता काबीज करता यावी, सत्तेचा जास्तीत जास्त वाटा मिळावा म्हणून कुणाचा प्रयत्न सुरू होता.
  • पुण्यात या प्रश्नांची उत्तरं देता येत नसतील तर दिल्लीत जाऊन द्यावीत.

 

हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात!

  • मी राज्यातल्या भाजपच्या वैफल्यग्रस्त नेत्यांकडे पाहतोय.
  • पण आता त्यांचे सर्वोच्च केंद्रीय नेतेही त्याच वैफल्यातून महाराष्ट्रात येऊन बोलत आहेत. हे आम्ही पाहिलं.
  • आम्हाला सगळ्यांना त्यांची दया आली आणि आश्चर्यही वाटलं.
  • महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करण्यात आला. हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या दोन-अडीच वर्षांपासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • पुण्यामध्ये सत्य, न्याय याचीच गर्जना घुमलीय.
  • तुम्ही टिळक पाहिले असतील किंवा त्यांच्या आधी अनेक संत, सज्जन पाहिले असतील.
  • पण, अमित शाहजी काल पुण्यात आले. त्यांचे वक्तव्य पूर्णपणे असत्याला धरून आहे.
  • कालच्या संपूर्ण भाषणामध्ये अमितभाई नेमके खरे काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो.
  • आमच्या सरकारविषयी, आमच्या भूमिकेविषयी, आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या दोन-अडीच वर्षांपासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • तरीही जनता विश्वास ठेवायला तयार नाही!

 

शिवसेना हिंदुत्ववादीच!

  • हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेनं सोडला नाही. सोडणार नाही.
  • सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी २०१४ ला शिवसेनेला दूर करा, असे राज्यातल्या भाजप नेत्याला खासगीत सांगणारे कोण होते?
  • ते असंही म्हणत आहे की राजीनामा देऊन वेगळे लढवून दाखवा.
  • २०१४मध्ये साली आम्ही वेगळेच लढलो होतो.
  • प्रचंड ताकद, पैसा, केंद्रीय सत्ता याची कृत्रिम लाट असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने लढलो.
  • चांगला विजय संपादन केला.
  • २०१४पासून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण?

Previous Post

गोवा मुक्ती दिनी विनाशिका ‘मॉरमुगाओ’ पहिल्या सागरी चाचण्यांसाठी रवाना

Next Post

ऑक्टोबरमध्ये बेपत्ता मासेमारी बोट समुद्र तळी सापडली, नौदलाच्या कामगिरीमुळे अपघात टळणार

Next Post
ins makar find out fishing trawler in mud near ratnagiri

ऑक्टोबरमध्ये बेपत्ता मासेमारी बोट समुद्र तळी सापडली, नौदलाच्या कामगिरीमुळे अपघात टळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!