मुक्तपीठ टीम
मध्य रेल्वेच्या वाशी-पनवेल हार्बर मार्गावरील काही प्रवाशांचा बुधवारचा प्रवास ‘ थंडा थंडा…कुल कुल ’ झाला. थंडगार एसी लोकलमधून प्रवास करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर बुधवारी पूर्ण झाले. एसी कोचमध्ये मोजकेच प्रवासी असल्यामुळे प्रवाशांना एैसपैस बसता आले. त्यातच फेरीवाल्यांची ओरड होत नसल्यामुळे त्यांचा प्रवास शांततेत झाला. या मार्गावर प्रथमच एसी लोकलच्या १२ फे-या धावल्याआहेत. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या साध्या लोकलच्या बदल्यात या एसी लोकल्स चालविण्यात येतील. सीएसएमटी ते अंधेरी आणि पनवेल ते अंधेरी सर्व फे-या गोरेगावपर्यंत चालविण्यात आल्या.
बुधवारी, १ डिसेंबरपासून हार्बर, ट्रान्सहार्बर आणि बेलापूर-नेरूळ-खारकोपर मार्गाचे सुधारित वेळापत्रक लागू झाले. नव्या वेळापत्रकानुसार यातील एक फेरी वाशी ते सीएसएमटी आणि ११ फे-या सीएसएमटी ते पनवेल चालविण्यात येणार आहेत.
हार्बरवरील एसी लोकलचे वेळापत्रक
- वाशी येथून स.४.२५ वा.
- सीएसएमटी स.५.१८ वा.
- पनवेल स.६.४५ वा.
- सीएसएमटी स. ८.०८ वा.
- पनवेल स.९.४० वा.
- सीएसएमटी स.११.०४ वा.
- पनवेल दु.१२.४१ वा.
- सीएसएमटी दु.२.१२ वा.
- पनवेल दु.३.४५ वा.
- सीएसएमटी सायं.५.०८ वा.
- पनवेल सायं.६.३७ वा.
- सीएसएमटी रा.८ वा.
सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (सीएसएमटी ते कल्याण) एसी लोकलच्या १० आणि ट्रान्सहार्बर मार्गावर (ठाणे ते वाशी-पनवेल ) एसी लोकलच्या १६ फे-या चालविण्यात येतात.
हे ही वाचा:
पनवेलहून गोरेगावला पहिली लोकल नेण्याचा मान मोटरमन मुलचंद मीना यांना!
आठ महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या सेवेत रुजू
पनवेलहून गोरेगावला पहिली लोकल नेण्याचा मान मोटरमन मुलचंद मीना यांना!