मुक्तपीठ टीम
भारतीय रिझर्व्ह बँककडून लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडवर निर्बंध लादण्यात आले आहेत. बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान आरबीआयकडून निर्बंध लादल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सहकार खात्याने लक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबतचा आदेश कढला आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आता बँकेवर दोन सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.
बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध
रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार लक्ष्मी सहकारी बँक मध्यवर्ती बँकेच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही. तसेच, बँक कोणतीही गुंतवणूक करणार नाही किंवा कोणतेही पैसे देणार नाही किंवा पेमेंट करण्यास संमती देणार नाही.
बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा १,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
सहा महिन्यांसाठी निर्बंध
- आरबीआयने सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँकेवर निर्बंध लादले आहेत.
- बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे.
- बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा १,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
- रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, बँकिंग नियमन कायदा, १९४९ अंतर्गत लादलेले निर्बंध १२ नोव्हेंबर २०२१ रोजी कामकाजाचे तास बंद झाल्यानंतर सहा महिने लागू राहतील. यादरम्यान निर्बंधांचा आढावा घेतला जाईल.
जम्मू-काश्मीर बँकेचे तिमाही निकाल
- दुसरीकडे, सार्वजनिक क्षेत्रातील जम्मू-काश्मीर बँकेचे तिमाही निकाल आले आहेत.
- सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत त्याचा निव्वळ नफा दुपटीने वाढून १११.०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
- यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेला ४३.९३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
- स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या संप्रेषणात, बँकेने सांगितले की तिमाहीत त्यांचे निव्वळ उत्पन्न वाढून रु.२,२०१,२६ कोटी झाले आहे जे मागील वर्षीच्या तिमाहीत रु २,१९४,४७ कोटी होते.
- या तिमाहीत बुडीत कर्जे आणि इतर आकस्मिक परिस्थितींसाठी बँकेची तरतूद १९२.६८ कोटींवर घसरली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. ३२४.९२ कोटी होती.