मुक्तपीठ टीम
जर तुम्हाला चांगला कॅमेरा तसेच कमी वेळेत फुल चार्ज होणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. दरम्यान अनेक कंपन्यानी आपले नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. ज्यात जियो, विवो,सॅमसंग, रेडमी, आयफोन इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे शाओमी सुद्धा आता पाठी राहिलेला नाही. लवकरच शाओमी भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन शाओमी11i हायपरचार्ज आणत आहे. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे फिचर्स म्हणजे यामध्ये 120W फास्ट चार्जिंग आहे, म्हणजेच १५ मिनिटांमध्ये फोन पूर्ण चार्ज होऊ शकतो. यामुळे डिव्हाइसच्या नावात हायपरचार्ज हा शब्द वापरण्यात येणार आहे.
१५ मिनिटांत होणार चार्ज
- शाओमी इंडिया यावेळी वेगवेगळ्या चार्जिंग स्पीडसह दोन मॉडेल आणू शकतो.
- रेडमी नोट 11 प्रो ला शाओमी 11आय म्हटले जाईल
- रेडमी नोट 11 प्रो+ शाओमी 11आय हायपरचार्ज असे म्हटले जाईल.
- 20W फास्ट चार्जिंगसह, शाओमी11आय हायपरचार्ज स्मार्टफोन १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होणार.
- 67W फास्ट चार्जिंगसह, शाओमी11आय मध्ये आढळू शकते.
शाओमी11 आय आणि 11i हायपरचार्जचे फिचर्स
- नवीन शाओमी हा एमआय10i डिव्हाइसची जागा घेण्याची शक्यता आहे.
- इतकंच नव्हे तर ते चीनी रेडमी नोट 11 प्रो + मॉडेलवर आधारित असेल.
- भारतात तो फोन नव्या नावाने लॉँच केला जाणार आहे.
- दोन्ही फोन आधीच चीनमध्ये वेगळ्या नावाने लाँच झालेत.
- दोन्ही फोन MediaTek Dimensity 920 5G प्रोसेसरद्वारे 5G ला सपोर्ट करतील.
- दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080p रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता.
- फोटोसाठी 108MP चा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो.
- शाओमी 11i मध्ये 5160mAh बॅटरी असेल आणि 67W फास्ट चार्जिंग दिले जाईल.
- शाओमी 11i हायपरचार्जमध्ये 4500mAh बॅटरी असेल व 120W फास्ट चार्जिंग दिले जाईल.
- फोनच्या लाँचची तारीख अद्याप समजलेली नाही