मुक्तपीठ टीम
देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले असले तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. सणासुदीनंतरही कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता उच्च न्यायालयाने नागरिकांना फटकारले आहे. कोरोना रुग्ण वाढण्यामागे नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूतत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. लोकल प्रवासासाठी लसीकरण सक्तीचे करण्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.
लसीकरणावरून भेदभावाचा आरोप करणारी याचिका
- व्यापक जनहितासाठी सरकारने निर्बंध घातले तर त्यात काही गैर नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केल्याकडेही न्यायालयाने या वेळी प्रामुख्याने लक्ष वेधले.
- लसीकरणाच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही आणि त्यांच्यावर असे निर्बध घालणे हे नागरिकांच्या समानतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.
- मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली.
- त्यावेळी लसीकरणानंतरही कोरोना अधिक झपाट्याने फैलावत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला.
कोरोनाची दुसरी लाट ही बऱ्यापैकी ओसरली आहे. यामुळे सरकारने निर्बंध कमी केले आहेत. लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. इतके असताना मात्र सणासुदींच्या दिवसांमुळे कोरोना पुन्हा वाढत आहे. याचं कारण म्हणजे नागरिकांचा निष्काळजीपणा हाच आहे. दिवाळी जवळ आली असताना लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जात आहेत. सोशल डिस्टंटसिंग, मास्क वापरणे इत्यादी कोरोनाचे नियम पाळले जात नाही. यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.
१०० टक्के फेऱ्या गुरुवारीपासून चालविण्यात येणार
- कोरोना लॉकडॉऊनमुळे जाहीर केल्याने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
- त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अत्यावश्यक सेवांमध्ये मुंबई लोकल ट्रेनचा समावेश केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यात आल्या.
- यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच केवळ लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.
- मात्र १५ ऑगस्टपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांना फक्त मासिक पास काढून लोकल प्रवास खुला करण्यात आला.
- लसवंतांना लोकल प्रवास खुला केल्यापासून दिवसेंदिवस लोकल मधील गर्दी वाढू लागली.
- वाढत्या गर्दीमुळे अनेक लोकल फेऱ्या कमी पडत होत्या.
- तर, नुकताच एका दिवसात ६० लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली.
- कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त २५ टक्के प्रवासी संख्या कमी आहे.
- या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी ९५ टक्क्यांहून १०० टक्के फेऱ्या गुरुवारीपासून चालविण्यात येणार आहे.