मुक्तपीठ टीम
भारतातील एकूण प्रजनन दरामध्ये बिहार आघाडीवर आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्याचे सर्व प्रयत्न असूनही, प्रजनन दर तेथे कमी झालेला नाही. उलट प्रजजन दरा बिहारने इतर राज्यांना मागे टाकले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ‘हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसिव्ह इंडिया’ या अहवालात जागतिक बँक आणि नीती आयोगाने हे सांगितले आहे. याच अहवालानुसार उत्तर प्रदेश प्रजजन दरात दुसऱ्या तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पुढची राज्यही उत्तरेतीलच आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांनी मात्र त्यावर नियंत्रण मिळवत तो कमी राखलेला आहे.
प्रजनन दर म्हणजे काय?
- प्रजनन दर म्हणजे स्त्रीच्या गर्भधारणेची क्षमता.
- म्हणजेच, १५ वर्षे ते ४९ वर्षे वयोगटातील महिला किती वेळा आई बनू शकते.
- विकसनशील देशांमध्ये जेथे प्रजनन दर जास्त आहे, तेथे गरीबी आणि उपासमारीव्यतिरिक्त स्त्री शिक्षणाचा अभाव आहे.
- महिलांशी भेदभाव केला जातो, श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग कमी आहे.
- एवढेच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही त्यांची भूमिका नगण्य आहे.
- परिणामी, ज्या राज्यांमध्ये प्रजनन दर जास्त आहे, त्यांची वाढ तुलनेने कमी आहे.
प्रजजन दर कुठे जास्त?
- २०१५ मध्ये बिहारमध्ये प्रजनन दर ३.२ होता, जो २०१६ मध्ये वाढून ३.३ झाला आहे.
- उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे प्रजनन दर ३.१ आहे.
- मध्य प्रदेशात २.८, राजस्थानमध्ये २.७ आहे.
- उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये हा आकडा स्थिर आहे.
- त्याचबरोबर झारखंडने येथील परिस्थिती सुधारली आहे.
- सन २०१५ मध्ये येथील एकूण प्रजनन दर २.७ होता, जो २०१६ मध्ये घट होऊन २.६ वर आला.
प्रजजन दरात कुठे सुधारणा?
- छत्तीसगड राज्यात हा दर २.५ वर स्थिर राहिला.
- तर हरियाणामध्ये ०.१ टक्क्यांनी वाढ झाली.
- या राज्यात प्रजनन दर २०१५ मध्ये २.२ होता, जो २०१६ मध्ये वाढून २.३ झाला.
- हा दर आसाममध्ये २.३, गुजरातमध्ये २.२ आणि ओडिशामध्ये २.० वर स्थिर राहिला आहे.
- उत्तराखंडमध्ये थोडीशी सुधारणा झाली. येथे प्रजनन दर २०१५ मध्ये १.९ होता, जो २०१६ मध्ये १.८ वर आला.
दक्षिणेतील राज्यांमध्ये प्रजजन दर कमी
- कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ (सर्व राज्यांचा प्रजनन दर १.८) आणि हिमाचल प्रदेश (१.७) मध्ये प्रजनन दरात कोणताही बदल झाला नाही.
- जम्मू आणि काश्मीरमध्ये, २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये प्रजनन दर ०.१ टक्क्यांनी वाढला.
- येथे प्रजनन दर २०१५ मध्ये १.६ होता, जो २०१६ मध्ये वाढून १.७ झाला.
- आंध्र प्रदेशात प्रजनन दर १.७ वर स्थिर राहिले, तर तेलंगणात २०१५ च्या तुलनेत ०.१ टक्के घट नोंदवली गेली. येथील सध्याचा प्रजनन दर १.७ आहे. पंजाबमध्येही हा दर १.७ वर स्थिर आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू १.६ च्या प्रजनन दरासह शेवटच्या स्थानावर आहेत.