मुक्तपीठ टीम
मुंबई सायबर पोलीस स्टेशनच्या ईमेल अकाउंट हॅकिंग प्रकरणाच्या प्राथमिक तपासात काही महत्वाच्या बाबी लक्षात आल्या आहेत. बनावट गुप्तचर अहवालांचे फिशिंग मेल खात्यामधून हजारहून अधिक सरकारी विभागांना आणि खासगी व्यक्तींना पाठवले गेले आहेत. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, हॅकर्सचा गोपनीय माहिती चोरण्याचा हेतू होता. तथापि, राज्य सायबर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि ईमेल मिळालेल्या व्यक्तींशी संपर्क साधला आणि त्यांचा पासवर्ड बदलण्यास सांगून या मोठ्या सायबर हल्ल्याचा दुष्परिणाम रोखला. हॅकरने त्यासाठी पाकिस्तानातील रावळपिंडीचा आयपी अॅड्रेस वापरला आहे,तर अटॅचमेंट पीडीएफ यूपीत बनवली आहे.
नेमकं कसं घडलं हॅकिंग
- हॅकर्सने पाठवलेल्या ईमेलमध्ये ‘मुंबईतील जेके हल्ल्यांमागील दहशतवादी मारले गेले आहेत’ असे लिहिले आहे.
- यासोबतच ‘इंटेलिजन्स रिपोर्ट’ नावाची पीडीएफही जोडण्यात आली आहे.
- एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडीएफ वर क्लिक केल्यास वापरकर्त्यांना थेट नवीन वेबसाईटवर नेले जाते.
- त्यांच्या ईमेल खात्यांमध्ये छेडछाड होऊ शकते.
- एवढेच नाही तर या आधी प्राप्त झालेले ईमेल वाचू शकत होते आणि एखाद्या व्यक्तीची गुप्त माहिती देखील मिळवू शकत होते.
- ईस्ट झोनमधील सायबर पोलिस स्टेशनच्या ईमेल आयडीवरून हा ईमेल पाठवण्यात आला होता.
देशाच्या विविध भागांतील लोकांना मिळाले मेल
- महाराष्ट्र सायबर पोलीस अधिकाऱ्यानी याबाबत माहिती दिली.
- सायबर पोलीस स्टेशनचे खाते हॅक झाले आहे, असे सांगण्यात आले.
- परंतु हॅकरना त्यास ऍक्सेस करता येत नव्हते.
- त्यांनी इमेल आयडीचा वापर करून मेल पाठवला.
- महाराष्ट्र, दिल्ली आणि देशाच्या इतर भागातील हजारो पोलीस कार्यालये, सरकारी अधिकारी आणि खाजगी व्यक्तींना फिशिंग ईमेल प्राप्त झाले
पोलिसांनी लोकांना कसे सावध केले? - राज्याचे सायबर पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी पोलिसांनी लोकांना कसं सावध कलें ते सांगितलं.
- सायबर पोलिसांच्या नियमित तपासणीत सायबर हल्ला उघड झाला.
- त्यानंतर, PGIBE कॉल, ईमेल आणि इतर माध्यमांद्वारे अधिकाधिक यूजर्सशी संपर्क साधून, त्यांच्या ईमेल खात्यांचे पासवर्ड बदलण्याचा सल्ला देऊन या सायबर हल्ल्याचा प्रभाव कमी करण्यात आला.
- हल्लेखोरांनी सायबल सेलचे ईमेल खाते तात्पुरते हॅक करून हे केले असावे.
फिशिंग ईमेल पाकिस्तानातून पाठवण्यात आला
- फिशिंग ईमेल रावळपिंडी पाकिस्तानातून पाठवण्यात आला होता.
- प्राथमिक तपासात असे आढळून आले.
- परंतु सायबर सेलला त्याबाबत खात्री नाही.
- सायबर गुन्हेगारांनी इतर पद्धती वापरून हा मेल पाकिस्तानच्या सर्व्हरवरून पाठवण्यात आला आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला असेल.
- पीडीएफ डॉक्युमेंट तयार करण्यामागे यूपीतील व्यक्तीचा हात असल्याचे कळले, पण त्याबद्दल अद्याप सांगितले जाणार नाही. प्रकरणाची तपासणी सुरू आहे.