मुक्तपीठ टीम
भारतीय हवाई दल आज ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी आपला ८९ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर आता संरक्षण दलांमध्येही पुरुषांच्या बरोबरीने महिलांसाठीही संधी मिळणार आहे. महिलांसाठी भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून भरतीचा पर्याय खुला झाला आहे. तुम्ही जर पात्र असाल तर हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर होण्यासाठी नेमकं काय करायचं त्याची माहित.
यूपीएससीने २४ सप्टेंबर २०२१ पासून भारतीय हवाई दलासह तिन्ही सेवांमध्ये १२ वी नंतर एनडीए परीक्षेसाठी महिलांकडून अर्ज मागवले आहेत.
‘फ्लाइंग ऑफिसर’ पदासाठी अर्ज कसा करणार?
- हवाई दलासह तिन्ही संरक्षण दलांमध्ये सरकारी नोकऱ्या केवळ सर्वोत्तम कारकीर्द आणि सुरक्षित भविष्य प्रदान करत नाहीत,
- तर सामाजिक प्रतिष्ठा आणि राष्ट्राला सेवेचा अभिमान देखील प्रदान करतात.
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज, ०८ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अर्ज करण्यास इच्छुक महिला उमेदवार आयोगाच्या अर्ज पोर्टल upsconline.nic.in वर दिलेल्या फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात.
- अर्ज प्रक्रियेच्या अधिक तपशीलांसाठी ही लिंक तपासा.
फ्लाइंग ऑफिसर होण्यासाठी पात्रता काय?
- महिला उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून १२वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- महिला उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह १२वी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- उमेदवार २०२१ च्या परीक्षेत बसण्यासाठी २ जानेवारी २००३ पूर्वी आणि १ जानेवारी २००६ नंतर जन्मलेला नसावा.
फ्लाइंग ऑफिसर होण्यासाठी निवड प्रक्रिया
- एनडीए (२) परीक्षा २०२१ यूपीएससी द्वारे १४ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
- उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारावर यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना संरक्षण मंत्रालय, सेवा निवड मंडळ (SSB) द्वारे आयोजित मुलाखत फेरी आणि वैद्यकीय परीक्षेच्या टप्प्यासाठी बोलवले जाईल.
- SSB टप्प्यातील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर, यशस्वी महिला उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि त्यांच्या भारतीय वायुसेनेच्या निवड होईल.
फ्लाइंग ऑफिसर होण्यासाठी प्रशिक्षण
- फ्लाइंग ऑफिसर होण्यासाठी तीन वर्षांचे शैक्षणिक आणि शारीरिक प्रशिक्षण दिले जाते.
- उत्तीर्ण झालेल्या हवाई दलाच्या कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीकडून उमेदवारांना B.Tech पदवी / B.Sc / B.Sc (संगणक) पदवी प्रदान केली जाईल.
- त्यानंतर, फ्लाइंग किंवा नॉन-टेक्निकल ग्राउंड ड्यूटी शाखेचे कॅडेट्स एअर फोर्स अकॅडमी, हैदराबादला पाठवले जातील आणि एअर फोर्स कॅडेट ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक शाखा) एअर फोर्स टेक्निकल कॉलेज, बंगळुरूला पाठवली जाईल.
- हवाई दलाच्या कॅडेट्सना संबंधित अकादमीमध्ये दीड वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, कॅडेट्सना भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून स्थायी आयोग (नियुक्ती) देण्यात येईल.