मुक्तपीठ टीम
आजकाल युट्यूब हा सर्वसामान्याच्या जीवनाचा हा भाग बनला आहे. एखादी रेसिपी बनवायची असेल किंवा चित्रपट पाहायचा असेल सर्व काही युट्युबवर असतं. मनोरंजनाचा भांडार असं युट्युबला बोलले तरी चालेल. मात्र याच युट्यूबचा वापर जेव्हा गैरमार्गासाठी केला जातो तेव्हा ते एखाद्याच्या जीवावर बेतते. असाच एकप्रकार घडला आहे नागपुरमध्ये.
एका २५ वर्षीय गर्भवती महिलेने यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना महिलेची प्रकृती खालावली आणि नंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याचवेळी, ज्या व्यक्तीने तिला गर्भवती केले त्याच्यावर बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यूट्यूब पाहून गर्भपाताचा जीवघेणा सल्ला
- ही घटना नागपुरातील यशोधरा नगर परिसरात घडली.
- ‘महिलेने पोलिसांना सांगितले की शोएब खान (३०) नावाचा एक पुरुष २०१६ पासून लग्नाच्या आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करत होता.
- जेव्हा ती गर्भवती झाली, तेव्हा खानने तिला यूट्यूब व्हिडिओ पाहून आणि त्यात नमूद केलेली औषधे घेऊन गर्भपात करण्यास सांगितले.
- ती स्वतःचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करत असताना, महिलेची प्रकृती बिघडली.
- तिच्या कुटुंबातील सदस्यांना तिला रुग्णालयात न्यावे लागले.
- बलात्कारप्रकरणी खानला अटक करण्यात आली आहे.