मुक्तपीठ टीम
कोरोनाचं सावट असल्याने यंदाच्या नवी दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात काही बदल दिसणार आहेत. तसंच देशाला या सोहळ्यात काही खासही पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वायुदलाच्या परेडमध्ये राफेल विमानांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच राफेल विमानाची झलक सर्वसामान्यांना पाहता येईल.
प्रजासत्ताक दिनी वायुदलाच्या परेडमध्ये व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशनमध्ये (कमी उंचीवरुन उड्डाण करुन सरळ वरती जात शक्तीप्रदर्शन करत एका विशिष्ट उंचीवर स्थिर होणं) उड्डाण करतील.
- राफेलव्यतिरिक्त ४१ विमानं वायुदलाच्या परेडमध्ये सहभागी होतील.
- २१ हेलिकॉप्टर, १५ लढाऊ विमानं, ५ मालवाहतूक विमानं आणि एक विंटेज डकोटा विमान सहभागी आहे.
- लढाऊ विमानांमध्ये राफेल, सुखोई- ३० आणि मिग २९ विमानांचा सहभाग आहे.
- सर्व विमानांची उड्डाणं संपण्यापूर्वी राफेल, २ जॅग्वार आणि २ मिग २९ विमानांसोबत एकत्रित उड्डाण करतील.
राफेलबद्दल सर्व काही!
- राफेलची निर्मिती फ्रान्समध्ये झाली आहे.
- फ्रान्सची एअरक्राफ्ट बनवणारी कंपनी दसाँ एव्हिएशनने याची निर्मिती केली आहे.
- पहिल्यांदा मे २००१ मध्ये राफेल बनवलं गेलं.
- भारतीय वायुसेनेव्यतीरिक्त मिस्त्र, कतार, ग्रीस आणि इतर अनेक देश राफेलचा वापर करत आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालिन राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांच्यात एप्रिल २०१५ मध्ये ३६ राफेल लढाऊ विमानांसाठी ५९ हजार कोटींचा करार झाला.
- या करारानंतर काँग्रेस पक्षाने यात भ्रष्टाचाराचा आरोप केला.
- २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भाजप सरकारने केलेल्या कराराच्या बाजूने निकाल दिला.
- यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेवरच्या सुनावणीसाठी नकार दिला.
- ऑक्टोबर २०१९ मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देशाचं पहिलं राफेल विमान आणण्यासाठी फ्रान्सला गेले.
- जुलै २०२० मध्ये भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांनी देशाच्या पहिल्या ५ राफेल विमानांना उड्डाण करत भारतात आणलं.
- मे महिन्यातच या विमानांचं आगमन होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनामुळे थोडा विलंब झाला.
- ही राफेल विमानं अंबाला एअरबेसवर उतरल्यानंतर त्यांचा समावेश भारतीय वायुसेनेत करण्यात आला.
- आता पर्यंत भारताकडे ३६ पैकी ८ लढाऊ विमानं सुपूर्त झाली आहेत.
- या महिन्याअखेपर्यंत आणखी ३ राफेल विमानं भारतात येऊ शकतात.
- भारताने जवळपास २ दशकांनंतर परदेशी विमानांची खरेदी केली आहे.
- याआधी जून १९९७ मध्ये रशियाच्या सुखोई -३० विमानांचा भारतीय वायुसेनेत समावेश झाला आहे.