Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शेतकरी मोर्चात भेंडीबाजारातील महिला! ‘त्या’ महिला शेतकरी कशा?”

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा खळबळजनक आरोप

January 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

कृषी कायद्याविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. आजच्या मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त आहे, शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त होते.’भेंडी बाजारातील महिला शेतकरी कधी पासून झाल्या ? अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शेतकरी मोर्चावर केली आहे.

 

काल ज्या महिला आझाद मैदावर उपस्थित होत्या त्या महिला भेंडी बाजारातील होत्या मग त्या महिला आजच्या मोर्चात सहभागी कशा झाल्या होत्या, असा दावा दरेकर यांनी केला. शेतकरी मोर्चाचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार होते. परंतु राज्यापालांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते राजभवनावर उपस्थित नाहीत.परंतु राज्यपालांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, अशी टीका या आंदोलक शेतकऱ्यांकड़ून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांची काही राजकीय पक्षांकडून दिशाभुल होत आहे. ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे संवेदनशील आहेत.

 

ते सगळ्यांना भेटतात त्यांच्यावर विनाकारण टीका नको. कोरोना संकट काळात राज्यपालांचे काम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. राज्यपालांकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून गोव्यातील अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे नियोजन चार महिन्यापूर्वीच करण्यात आले होते. विधीमंडळाचे कार्यक्रम चार महिन्यांआधी ठरतात हे सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना विधिमंडळाच्या नियोजनाची माहिती नाही का? झोपलेल्या लोकांना उठवता येतं, परंतु झोपेचे सोंग केलेल्यांना उठवता येत नाही,असं म्हणत दरेकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

 

शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न होतोय,पूर्ण पणे शेतकऱ्यांच्या विषयी ढोंग या मंडळींचं सुरू आहे. शरद पवारांची भूमिका सातत्याने बदलत असते हे सगळ्यांनी पाहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते मोर्चाला न गेल्याने त्यांची भूमिका बदललेली दिसत आहे. शिवसेनेनं त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.


Tags: Azad MaidanBJPFarmer protestmumbai farmer marchpravin darekarअझाद मैदानअनिल देशमुखप्रविण दरेकरभाजप
Previous Post

#अध्यात्म चैतन्य

Next Post

प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच शक्तिशाली ‘राफेल’ची झलक

Next Post
rafel

प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच शक्तिशाली ‘राफेल’ची झलक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!