Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच शक्तिशाली ‘राफेल’ची झलक

January 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
rafel

मुक्तपीठ टीम

कोरोनाचं सावट असल्याने यंदाच्या नवी दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात काही बदल दिसणार आहेत. तसंच देशाला या सोहळ्यात काही खासही पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वायुदलाच्या परेडमध्ये राफेल विमानांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच राफेल विमानाची झलक सर्वसामान्यांना पाहता येईल.

 

प्रजासत्ताक दिनी वायुदलाच्या परेडमध्ये व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशनमध्ये (कमी उंचीवरुन उड्डाण करुन सरळ वरती जात शक्तीप्रदर्शन करत एका विशिष्ट उंचीवर स्थिर होणं) उड्डाण करतील.

rafel

  • राफेलव्यतिरिक्त ४१ विमानं वायुदलाच्या परेडमध्ये सहभागी होतील.
  • २१ हेलिकॉप्टर, १५ लढाऊ विमानं, ५ मालवाहतूक विमानं आणि एक विंटेज डकोटा विमान सहभागी आहे.
  • लढाऊ विमानांमध्ये राफेल, सुखोई- ३० आणि मिग २९ विमानांचा सहभाग आहे.
  • सर्व विमानांची उड्डाणं संपण्यापूर्वी राफेल, २ जॅग्वार आणि २ मिग २९ विमानांसोबत एकत्रित उड्डाण करतील.

 

राफेलबद्दल सर्व काही!

rafel

  • राफेलची निर्मिती फ्रान्समध्ये झाली आहे.
  • फ्रान्सची एअरक्राफ्ट बनवणारी कंपनी दसाँ एव्हिएशनने याची निर्मिती केली आहे.
  • पहिल्यांदा मे २००१ मध्ये राफेल बनवलं गेलं.
  • भारतीय वायुसेनेव्यतीरिक्त मिस्त्र, कतार, ग्रीस आणि इतर अनेक देश राफेलचा वापर करत आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालिन राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांच्यात एप्रिल २०१५ मध्ये ३६ राफेल लढाऊ विमानांसाठी ५९ हजार कोटींचा करार झाला.
  • या करारानंतर काँग्रेस पक्षाने यात भ्रष्टाचाराचा आरोप केला.
  • २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भाजप सरकारने केलेल्या कराराच्या बाजूने निकाल दिला.
  • यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेवरच्या सुनावणीसाठी नकार दिला.
  • ऑक्टोबर २०१९ मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देशाचं पहिलं राफेल विमान आणण्यासाठी फ्रान्सला गेले.
  • जुलै २०२० मध्ये भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांनी देशाच्या पहिल्या ५ राफेल विमानांना उड्डाण करत भारतात आणलं.
  • मे महिन्यातच या विमानांचं आगमन होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनामुळे थोडा विलंब झाला.
  • ही राफेल विमानं अंबाला एअरबेसवर उतरल्यानंतर त्यांचा समावेश भारतीय वायुसेनेत करण्यात आला.
  • आता पर्यंत भारताकडे ३६ पैकी ८ लढाऊ विमानं सुपूर्त झाली आहेत.
  • या महिन्याअखेपर्यंत आणखी ३ राफेल विमानं भारतात येऊ शकतात.
  • भारताने जवळपास २ दशकांनंतर परदेशी विमानांची खरेदी केली आहे.
  • याआधी जून १९९७ मध्ये रशियाच्या सुखोई -३० विमानांचा भारतीय वायुसेनेत समावेश झाला आहे.

Tags: rafelrepublic dayप्रजासत्ताक दिनराफेलवायुदल
Previous Post

“शेतकरी मोर्चात भेंडीबाजारातील महिला! ‘त्या’ महिला शेतकरी कशा?”

Next Post

“बहुमताच्या बळावर कृषि कायदे मंजूर केले, तरी ते मागे घ्यावे लागणारच!”

Next Post
Sharad Pawar Azad Maidan -1

"बहुमताच्या बळावर कृषि कायदे मंजूर केले, तरी ते मागे घ्यावे लागणारच!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!