मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाची स्थिती सुधारू लागल्यानंतर आयआरसीटीसीने प्रवासासाठी अनेक मस्त ऑफर सुरु केल्या आहेत. आयआरसीटीसी च्या विविध ऑफरद्वारे, अगदी कमी पैशात संपूर्ण भारतभर फिरू शकता. यासह, अनेक विशेष सुविधा विनामूल्यही मिळतील. असंच एक पॅकेज संपूर्ण मेघालयात प्रवास करण्याची संधी देणारे हे. या पॅकेजमध्ये रॉयल एनफील्ड बाईक राइडही मिळेल. बाईकवर मेघालयचं सौंदर्य अनुभवण्यासाठी वेगळे पैसेही मोजावे लागणार नाहीत.
मेघालय पॅकेजमध्ये कुठे फिरायचं?
- या पॅकेजमध्ये शिलाँग, चेरापुंजी आणि शोंगपाडेंगला फिरण्यास मिळेल.
- ६ रात्र आणि ७ दिवसांची ही टूर असेल.
- हा टूर १३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होईल आणि १९ नोव्हेंबर रोजी संपेल.
- यात १० जागा आहेत.
- जेवण आणि नाश्ता टूर पॅकेजमध्ये उपलब्ध असतील.
गुवाहाटी-शिलाँग-चेरापुंजी-शोंगपाडेंग आणि परत गुवाहाटीच्या प्रवासासाठी सेल्फ ड्राइव्ह मोटरसायकलही मिळेल. यासाठी रॉयल एनफील्ड ही गाडी असेल.
मेघालय पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा असणार?
- स्टॅन्डर्ड कॅटेगरीमधील हॉटेल उपलब्ध असेल, तसेच जेथे हॉटेल/रिसॉर्ट उपलब्ध नाही, तेथे कॅम्पिंग सुविधा उपलब्ध असेल.
- नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यासह रिफ्रेशमेंट सुविधा ही मिळेल.
फिरण्यासाठी रॉयल एनफील्ड मोटरसायकल मिळेल. - रॉयल एनफील्ड मोटरसायकलसह हेल्मेट, नी गार्ड, हातमोजे आणि राईडिंग जॅकेट देखील उपलब्ध असेल.
- रोड ट्रिपदरम्यान मूलभूत साधनांसह मेकॅनिक देखील उपलब्ध असेल.
- प्रवासासाठी चालक आणि इंधनासह एमयूव्ही बॅक अप वाहन देखील उपलब्ध असेल.
मेघालय पॅकेज बुक कसं करायचं?
- एका व्यक्तीला प्रवास करायचा असेल तर या दौऱ्यासाठी ४४,६४० रुपये खर्च करावे लागतील.
- दोन व्यक्तींना प्रवास करायचा असल्यास, ३८,३२० रुपये खर्च करावे लागतील.
- या पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=EGH030 या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता. तुम्ही हे पॅकेज देखील येथून बुक करू शकता.