Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पर्यावरणस्नेही बीजमोदक, डोंगर-दऱ्यांमध्ये बहरू दे निसर्ग कृपा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
seed modak

मुक्तपीठ टीम

बंधनं असली तरी कल्पनेला निर्बंध नसतात. त्यामुळे बुद्धीदात्या गणरायाच्या उत्सवात बुद्धीचा सकारात्मक वापर केला तर अनेक चांगले उपक्रम राबवता येतात. गोरेगावमधील राष्ट्र सेवा दल कार्यकर्त्यांच्या बीज मोदकांचा उपक्रम असाच आहे. गणेशोत्सवात पर्यावरणाकडून घेतलेलं त्यालाच परत करण्याचा प्रयत्न करणारा. कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या बिया मिसळून मातेचे बीज मोदक घडवलेत. ते आता कोकणपट्ट्यातील डोंगर-दऱ्यांमध्ये निसर्गाला अर्पण केले जातील.

seed modak

बीजमोदकांचा पर्यावरणस्नेही उपक्रम

  • हे मातीचे विशेष बीजमोदक गोरेगावातील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेत.
  • खत मिश्रित मातीत विविध झाडांच्या बिया घालून असे असंख्य मोदक तयार झालेत.
  • कोकणात पूरस्थिती होतीच पण अनेक ठिकाणी भूस्खलन झालं.
  • डोंगराला भेगा पडल्यात.
  • याठिकाणी या मोदकांचा नैवेद्य वसुंधरेला अर्पण करायला हे तरूण जाणार आहेत.
  • पुन्हा नवे अंकूर फुलवणं हे कोणत्याही पुजेअर्चेपेक्षा महान आहे.

seed modak

गणपतीच्या एका प्रचलीत कथेत वसुंधरेला आईची उपमा देण्यात आलीय. सणांच्या गोंगाटात सामाजिक आशयांचंही स्खलन होवून गेलंय. या पार्श्वभूमीवर या डोळस सेवा दल सैनिकांनी हा उपक्रम आखला आहे.

 

seed modak

राष्ट्र सेवा दल, गोरेगाव विभागातर्फे यंदाच्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ना तुमचं ना माझं पर्यावरण आहे आपल्या सर्वांचे या उपक्रमांतर्गत माती मध्ये नैसर्गिक खत आणि बी टाकून तयार केलेले मोदक आपल्या भेटीला येत आहेत.

seed modak

महाराष्ट्रातील अनेक पूरग्रस्त भागात जी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे लोकांच्या मनात निराशा आलेली आहे.त्या साठी हा seeds मोदक एक नवी उमेद म्हणून उभारी घेवू शकतो. पुढच्या काही दिवसात मुंबईतील गणेशोस्तव मंडळाच्या,सामाजिक संस्था,कार्यकर्ते यांच्या माध्यमातून राष्ट्र सेवा दल हा प्रयत्न करू मागते आहे. कोकणातील सह्याद्रीच्या डोंगर रांगा मध्ये या बिया टाकून नव्याने जंगल वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल.

चला तर सर्वांनी मिळून हा प्रयत्न करू या….

seed modak

संपर्क :
ज्योती बामगुडे :- 7045446357
स्वप्नाली गोंधळी:- 80978 23222

 

बीजमोदक उपक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. तर तेजस साळसकर यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी निसार अली सय्यद,विशाल गोंधळी, स्वप्नाली गोंधळी,वैशाली महाडिक, नवदीप तुरे, अमर भगत, अलका खराडे, मनोज खराडे, चंद्रकला भोजने, श्रेयस तांबे, सुमित कांबळे, पौर्णिमा चौगुले, रवी घोडके ही टीम काम करत आहे. राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष कृपेश कांबळे, संघटक ज्योती बामगुडे यांचा उपक्रम राबवण्यात मोठा वाटा आहे.


Tags: rashtra seva dalSeed Modak initiativeज्येष्ठ पत्रकार युवराज मोहितेबीजमोदक उपक्रमराष्ट्र सेवा दल
Previous Post

‘जिजाऊ’ची गणेशोत्सव सजावट स्पर्धा…आकर्षक पुरस्कारांची ऑनलाईन संधी

Next Post

मेघालय पर्यटनाचं मस्त पॅकेज, आठवडाभर फिरा, आठवणी जपा!

Next Post
meghalaya

मेघालय पर्यटनाचं मस्त पॅकेज, आठवडाभर फिरा, आठवणी जपा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!