मुक्तपीठ टीम
राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. याचं एक उदाहरण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपरिषदेत पाहायला मिळत आहे. राज्यात भाजपा-शिवसेनाची युती होईल की नाही माहित नाही, पण बुटीबोरी नगरपरिषदेत भाजप आणि शिवसेना एकत्र आली आहे. भाजपाशी युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी आघाडी सरकार स्थापन केल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार टीका होत असतात. मात्र नागपूरात याचं उलट बघायला मिळालं आहे.
बुटीबोरीत जुने मित्र पुन्हा एकत्र!
- शिवसेना खासदार कृपाल तुमाने आणि भाजप आमदार समिर मेघे यांच्या प्रयत्नाने बुटीबोरी नगरपरिषदेत दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.
- सभापती निवडीसाठी या दोन पक्षांनी युती केली आहे.
- सेना आणि भाजप एकत्र आल्यानं बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे पाच तर शिवसेनेचा एक सभापती बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्यात असावा बुटीबोरी पॅटर्न…
- तसेच बुटीबोरीत भाजपचे बबलू गौतम हे नगराध्यक्ष आहेत.
- दरम्यान राज्यातही भाजप शिवसेनं एकत्र येत हेच मॉडेल राबवलं पाहिजे, अशी इच्छा देखील बबलू गौतम यांनी व्यक्त केली.
- विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुटीबोरी नगरपरिषद दत्तक म्हणून घेतली आहे.
- त्यामुळे बुटीबोरी नगरपरिषदेत सेना-भाजपाला एकत्र आणण्यात नेमका कोणाचा हात आहे, याबाबतही जोरदार चर्चा सुरु आहे.